क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश
क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश. त्याला भाजपच्या नव्याने गठित राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारी समितीमध्ये विशेष आमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 21 November 2026 : डीलिमिटेशन बिलावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु आहे. खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आणि डीलिमिटेशन बिलाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी 150 कोटींचा भाव लावण्यात आलाय असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा 100 कोटी होता आता तो 150 कोटींवर गेलाय असं राऊत म्हणाले. राऊतांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली. महाराष्ट्रात दुष्काळाचे संकच अधिक गडद होत चालले आहे. अशातच दुष्काळावरुन राजकारण देखील सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व घडामोडींचे लेटेस्ट अपडेय.
क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश. त्याला भाजपच्या नव्याने गठित राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारी समितीमध्ये विशेष आमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लॉरेंस बिश्नोई गँगचा नेपाळमध्ये हायडआऊट असल्याची मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासात माहिती
- अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात अटक आरोपींसाठी नेपाळमध्ये लपण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती
- गोळीबाराची घटना घडवण्यापूर्वी आरोपी नेपाळमध्ये 3 ते 4 दिवस मुक्कामाला होते
- आरोपींना आधी नेपाळमध्ये नेण्यात आले होते, चौकशीदरम्यान आरोपींची माहिती
- टार्गेटवर गोळीबार केल्यानंतर याच मार्गाने पुन्हा नेपाळमध्ये यायचे, अशी आरोपींना सूचना देण्यात आली होती
- नेपाळमध्ये परतल्यानंतर गँगमधील सदस्य आरोपींना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार होते
- भारतीय तपास यंत्रणांना पकडता येणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी आरोपींना लपवण्याचा गँगचा प्लॅन होता
- गोळीबारानंतर आरोपी ऋतिक कुमार, फूलसिंह नरेश आणि रेहान अन्सारी उर्फ सुक्का हे नेपाळच्या दिशेने पळून जाण्याऐवजी कोटाच्या दिशेने पोहोचले
- कोटा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात लॉरेंस बिश्नोई गँगच्या नेपाळमधील सुरक्षित आश्रयस्थानाचा खुलासा
बारामती एमआयडीसी मध्ये उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार. अज्ञातांनी दोन राऊंड फायर केल्याची माहिती.. शिवशंभोनगर मधील उद्योजक राजन कोळेकर यांच्या वाहनावर गोळीबार झाला आहे. सुदैवानं कोणीही जखमी नाही.. बारामती तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
बारामती एमआयडीसी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास बारामती एमआयडीसी मधील उद्योजकाच्या गाडीवर अज्ञातांनी दोन राऊंड फायर केलेत. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
बारामतीच्या शिवशंभोनगर मधील उद्योजक राजन कोळेकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी घराजवळ येत दोन राउंड फायर केल्याची माहिती मिळत असून बारामती तालुका पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ई शिवाई बसने दोघांना चिरडले. घटनेत एका वयोवृद्धाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तात्काळ पोलिसांनी रुग्णालयात हलवले. अपघातानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू.
अहिल्यानगर-अहमदपुर राष्ट्रीय महामार्गावर कार-जीपचा अपघात ; कारचे इंजिन 100 फूट उडून पेट्रोल पंपात पडले, चार जखमी, एक गंभीर.
- बीड कडे चाललेल्या IPS वेंकटराम आणि त्यांच्या टिमने अपघातग्रस्तांना मदत करत घटनास्थळाची केली पाहणी.
- बीड तालुक्यातील नेकनूरजवळील महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर जोरदार धडक.
- अपघाताची तीव्रता इतकी की कारचे इंजिन उडून 100 फूट दूर पेट्रोल पंपात पडले.
- या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला असुन पाच जण जखमी आहेत.
- जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असुन शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नीट पेपरफुटी प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित झाले आहेत. 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार. न्यायालयाने सर्व 14 आरोपींविरोधात औपचारिक आरोप निश्चित केले. मात्र, सर्व आरोपींनी आरोप मान्य करण्यास नकार देत खटल्याला सामोरे जाण्याची भूमिका घेतली. 25 नोव्हेंबरपासून खटल्याला सुरुवात होणार आहे. आरोप निश्चित करण्यात आलेल्या कलमांमध्ये फसवणूक, विश्वासघात, भ्रष्टाचार आणि परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित तरतुदींचा समावेश आहे. NTA शी तज्ज्ञ म्हणून संबंधित असलेल्या मनीषा गुरुनाथ मांढरे, पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा संजय हवालदार यांच्याविरोधात सार्वजनिक सेवक या नात्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही आरोप निश्चित करण्यात आले आहेत
रत्नागिरीत दापोली-मंडणगड मार्गावर खर्डी-बागवाडी इथं एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय... या अपघातात दुचाकीस्वार सुरेंद्र गोरिवलेंचा जागीच मृत्यू झालाय... पालगडच्या दिशेनं जात असताना समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली आणि समोरुन येणाऱ्या एसटी बसला जाऊन धडकली... यात दुचाकीस्वार सुरेंद्र गोरिवलेंचा मृत्यू झालाय...
येवला तालुक्यातील वन्यजीव संवर्धन क्षेत्रात पाण्याअभावी हरणाचा तडफडून मृत्यू झाला. तीव्र उष्णतेमुळे नैसर्गिक पाणवठे कोरडेठाक पडलेत. त्यामुळे वन्यजीवांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. दरम्यान वनविभागाने काही ठिकाणी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलाय.
किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी.. रायगड किल्ल्याला लवकरच नवीन रोप वे मिळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा अवघ्या शंभर ते दीडशे रुपयांत रोप वे सेवा देण्याची संकल्पना असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, गडाचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने रोप वेचा प्रारंभ आणि अंतिम टप्पा निश्चित करण्याचे काम सुरू आहे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलंय.
अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाच्या शाही थाटावर आणि मंत्र्यांसाठी केलेल्या आलिशान व्यवस्थेवर आता सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकांना मदत मिळत नाही पण शासकीय कार्यक्रमांना रेड कार्पेट टाकला जातो. शेतकरी हवालदिल असतानाही सरकारचं लक्ष नाही, असा घणाघात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळेंनी केला. दहा मंत्र्यांसाठी आलिशान व्यवस्था केली जातंय... दरम्यान कार्यक्रमाला एकच मंत्री आल्याने दहा माणसांसाठी उभ्या ठेवण्यात आलेल्या आलिशान गाड्या आता दुसरा ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे
सोलापुरात शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. काल मंत्री भरत गोगावलेंनी आमदार अभिजीत पाटलांना मंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर आज उपमुख्यमंत्री शिंदे आणि अभिजीत पाटलांमध्ये भेट झाल्यानं राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले. या भेटीदरम्यान आमदार राजू खरे आणि उत्तम जानकर उपस्थित होते.
सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी घसरण पाहायला मिळत आहे.. दिवाळीनंतर अवघ्या 12 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 35 हजार रुपयांची घसरण झाली आहे... ही घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे...
राज्यातील जमीन आणि स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळ्या पैशाच्या वापराला आळा घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे... आता जमीन किंवा मालमत्ता व्यवहारात 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रोख व्यवहार झाल्यास त्याची माहिती थेट आयकर विभागाला दिली जाणार आहे
राज्यामध्ये रिक्त असणारे 5 हजार नर्सिंग पद आता करार पद्धतीने भरल्या शिवाय पर्याय नाही, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.. एमपीएससीमधून हे पद भरण्यासंदर्भातची मागणी नर्सिंग संघटनांची आहे. मात्र त्याला लागणारा विलंब लक्षात घेता,करार पद्धतीने भरल्याशिवाय आता पर्याय नसल्याचा मंत्री हसन मुश्रीफांनी स्पष्ट केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झालाय. पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे हा अपघात घडला. प्रवासादरम्यान ताफ्यातील 4 गाड्या एकमेकांवर आदळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून छगन भुजबळ सुखरूप असल्याची माहिती आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणासह बेकायदेशीर धाड प्रकरणाच्या चौकशीनंतर थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशावरून आदेश जारी केले आहेत.
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत, असं आवाहन सुनील तटकरेंनी केले. घात की अपघात, याचं सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. लवकरच तपासाचा अहवाल येईल, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला
रोहित पवार यांनी ज्या VSRकंपनीच्या विमानातून कधीही प्रवास न केल्याचा दावा केला होता, त्याच अपघातग्रस्त विमानातून आणि त्याच पायलटसोबत रोहित पवारांनी अजित पवारांसोबत प्रवास केला होता, असा खळबळजनक दावा नवनाथ बन यांनी केलाय... रोहित पवारांना खोटं बोलण्याची गरज काय असा सवालही बन यांनी उपस्थित केलाय.
भीमाशंकरच्या कुशीत होऊ घातलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाचा राज्य सरकारने फेरविचार करावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आहे. या प्रकल्पासाठी सरकारने विविध परवानग्या मिळवल्या आहेत. परंतु सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे.
'दुष्काळाचा महायुती,सर्व मित्रपक्षांनी खेळखंडोबा केला. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल. शेतक-यांना 5 हजार रुपये देऊन थट्टा केली. बाजारपेठेच्या माध्यमातून मदत करावी-प्रकाश आंबेडकर.