SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : 01 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 01 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported By Prashant Jadhav Written By Prashant Jadhav
Published: Nov 01, 2026, 06:23 AM IST | Updated: Nov 01, 2026, 09:40 AM IST
Image Credit: LIVE BLOG TICKER
Join

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 01 नोव्हेंबर 2026  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

01 Nov 2026, 9:39 AM

'अर्णब'नंतर आता आणखी एका वादळाचा धोका

CYCLONE ALERT : दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे...त्याचं हळूहूळू चक्रीवादळात रुपांतर होत आहे...आज त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे...यानंतर हे वादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत जाईल...उद्या हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे....या वादळाला मुरासू असं नाव देण्यात आलंय....'मुरासू'चा अर्थ नगारा असा आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

01 Nov 2026, 9:35 AM

दुष्काळी जालन्यात कृत्रिम पावसाची चाचपणी

JALANA : दुष्काळी जालन्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आलाय.. स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राची चाचपणी सुरू झाली आहे. इस्लामवाडी येथील टेकडीवरून ड्रोनच्या साहाय्याने क्लाऊड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. सुमारे 400 मीटर उंचीवरून ढगांमध्ये क्षार-आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली. जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच असा प्रयोग करण्यात आला. पारंपरिक विमानांच्या तुलनेत ड्रोनच्या माध्यमातून कमी खर्चात, विशिष्ट ठिकाणी आणि गरजेनुसार सीडिंग करता येऊ शकते का, याची पडताळणी या प्रयोगातून करण्यात आली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

01 Nov 2026, 9:24 AM

राज्यात नोव्हेंबरमध्येही थंडी नाहीच?

STATE COLD : IMDने शनिवारी जाहीर केलेल्या मासिक हवामान अंदाजानुसार, राज्यासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे....नोव्हेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. या महिन्यात मराठवाड्यात सरासरीइतके, तर राज्यात इतरत्र सरासरीपेक्षा जास्त किमान तापमानाची शक्यता आहे.

01 Nov 2026, 8:54 AM

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार

DELHI : राजधानी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात व्होट बचाव, देश बचाव रॅली निघणार आहे... ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.... महाराष्ट्रातून पाच हजार पेक्षा जास्त नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती...

01 Nov 2026, 8:16 AM

मुंबईत आजपासून सीएनजी प्रतिकिलो 1 रुपयानं महाग

MUMBAI CNG PRICE : मुंबईत आजपासून सीएनजी प्रतिकिलो 1 रुपयानी महागला आहे... आधीच वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक कात्री लागणार आहे... मुंबई आणि महानगर प्रदेशात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ९० रुपये इतका झाला आहे.... देशात तयार होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतींबरोबरच आयात केलेल्या वायूच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यातच देशांतर्गत उपलब्ध होणाऱ्या गॅसचा पुरवठा देखील कमी आहे... यामुळे महानगर गॅसकडून CNGच्या दरात एक रुपयाची वाढ झालीय... 

01 Nov 2026, 8:15 AM

व्यावसायिक गॅस 10 रुपयांनी महागला

COMMERCIAL GAS : सणासुदीच्या तोंडावर नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत... व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 10 रुपयांनी महागला आहे... आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी 2 हजार 774 रुपये मोजावे लागणार आहेत... दरम्यामन घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही... 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.

ZEENEWS TRENDING STORIES