Maharashtra Breaking News LIVE : 29 ऑक्टोबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 29 OCTOBER महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 29 OCTOBER महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
29 Oct 2026, 4:32 PM
ठाण्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने, आदित्य ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला
Minakshi Shinde Resign : शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा.. ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा.. मीनाक्षी शिंदेंकडून शिवसेनेतील पदाचा राजीनामा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा केला सुपूर्द.
29 Oct 2026, 3:04 PM
अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्रात प्रभाव
ARNAB CYCLONE IMPACT : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णब’ हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकले आहे... किनारपट्टीवर धडकल्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू ओसरत असली, तरी त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येत आहे... या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे... विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे....
29 Oct 2026, 3:02 PM
दिवाळीनंतर थंडीची पहिली लाट येण्याची शक्यता
STATE WINTER : दिवाळीनंतर थंडीची पहिली लाट येण्याची शक्यता आहे. मात्र यंदा थंडीचा हंगाम कमी काळ टिकण्याची शक्यता आहे. मध्येच पुन्हा उष्णता वाढू शकते. दिलासादायक बाब म्हणजे ऑक्टोबरमध्ये जाणवणारा उकाडा आता संपला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चांगली थंडी जाणवली होती. मात्र डिसेंबर आणि जानेवारीत थंडीचा जोर कमी होता. यंदाही थंडी कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचं लक्ष लागले आहे. दिवाळीनंतर गारवा वाढण्याची शक्यता असली, तरी यंदा सलग अनेक दिवस थंडी राहीलच, असे नाही. एकूणच, ऑक्टोबरचा उकाडा कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी थंडीसाठी दिवाळीनंतरच वाट पाहावी लागणार आहे. यंदा थंडी अधूनमधून जाणवेल; मात्र ती फार काळ टिकेलच असे नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून मुंबई महानगरातील तापमानात घट होतेय.. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी 21 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले, जे सरासरी किमान तापमानाहून 1.3 अंशांनी कमी होते, तर कुलाबा इथंही 25 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सध्या मुंबईत दिवसा उन्हाचा त्रास असला तरीही पहाटे गारवा जाणवतोय..
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.