Shivsena SC Hearing Live: आजची सुनावणी संपली
Shivsena SC Hearing Live: आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुनावणी होणार
Shiv Sena Symbol Supreme Court Hearing 25 November 2026 Updates : शिवसेना चिन्ह-पक्ष आणि आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एकनाथ शिदेंच्या वकिलांचाही युक्तिवाद संपला असून आता उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल प्रतियुक्तिवाद करत आहेत. सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर युक्तिवाद संपवण्यास सांगितला आहे. दरम्यान विधिज्ञ असीम सरोदे यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागू शकतो असे सूतोवाच दिले आहेत.
Shivsena SC Hearing Live: आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुनावणी होणार
कपिल सिब्बल
म्हणजेच, न्यायालयाच्या न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार विधानसभेतील 'सदस्य' या शब्दाच्या व्याख्येवर अवलंबून राहणार का? या व्याख्येचा उद्देश एवढाच आहे की एखादी व्यक्ती आमदार असताना तिच्याविरोधात अपात्रतेची कार्यवाही सुरू करता येते. ती कार्यवाही सुरू करण्यासाठी संबंधित व्यक्ती त्या वेळी आमदार असणे आवश्यक आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सुरू असलेली न्यायालयीन कार्यवाही आपोआप निष्फळ ठरेल, असा या व्याख्येचा अर्थ अजिबात नाही
विधानसभेचा कार्यकाळ संपला म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या वैधतेची तपासणी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार संपुष्टात येऊ शकत नाही
कपिल सिब्बल
शिंदेंनी 'सदस्य' या शब्दाच्या व्याख्येचा घेतलेला आधार धक्कादायक आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, सदस्याची व्याख्या विधानसभेच्या कार्यकाळाशी जोडलेली आहे. त्यामुळे विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संबंधित व्यक्ती आमदार राहत नाही. आणि तो आमदार नसेल, तर त्याच्याविरोधात अपात्रतेची कोणतीही कार्यवाही करता येणार नाही.
कपिल सिब्बल
केवळ विधानसभेचा कार्यकाळ संपला म्हणून न्यायालयांना न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार वापरण्यापासून रोखता येणार नाही. अपात्रतेची कार्यवाही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली असताना विधानसभेचा कार्यकाळ संपला हे कारण त्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची न्यायिक पुनरावलोकनाच्या माध्यमातून तपासणी करते तेव्हा संबंधित निर्णय देण्यात आला त्या वेळच्या परिस्थिती आणि तथ्यांच्या आधारे त्याची वैधता तपासली जाते.
निर्णय दिल्यानंतर घडलेल्या कोणत्याही घटनेमुळे न्यायिक पुनरावलोकनाची व्याप्ती कमी होत नाही. आमदार अपात्रता प्रकरणाचा मूळ आधार आजही कायम आहे. कारण अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या, त्यावर युक्तिवाद झाला आणि निर्णयही झाला, त्या वेळी विधानसभा अस्तित्वात होती आणि संबंधित प्रतिवादी आमदार होते. सर्वोच्च न्यायालय 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाची वैधता तपासत आहे.
कपिल सिब्बल
शिंदेंच्या वकिलांकडून सर्वप्रथम असा युक्तिवाद करण्यात आला की, विधानसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे अपात्रतेच्या याचिका निष्फळ ठरल्या आहेत. हा एक नवीन युक्तिवाद आहे. त्यानंतर अपात्रतेच्या याचिका दाखल केल्यानंतर घडलेल्या घटनांचा विचार करता येईल का असा दुसरा नवीन मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच खरी राजकीय पार्टी कोणती हे केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे ठरवता येते का हा मुद्दाही उपस्थित करण्यात आला
विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेताना कोणत्या तथ्यांचा आधार घेतला हेही आपण पाहिले आहे. याशिवाय वादग्रस्त तथ्यांवर अवलंबून राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदेंचा दावा आहे की, दहावी अनुसूची केवळ विद्यमान विधानसभा सदस्यांनाच लागू होते त्यांनी यासंदर्भात दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचा आणि नियमांचा आधार घेतला आहे
शिंदेंच्या म्हणण्यानुसार चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ नैसर्गिकरीत्या संपल्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष किंवा हे सर्वोच्च न्यायालय मूळ मागितलेला दिलासा देऊ शकत नाही. तसेच प्रतिवादी अपात्र ठरले आहेत अशी केवळ घोषणा करणेही दहाव्या अनुसूचीच्या कक्षेबाहेर आहे. पण माझे ते हा युक्तिवाद नेमका कोणत्या आधारावर करत आहेत?
आम्ही अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या, तेव्हा हे सर्व आमदार विधानसभेचे सदस्य होते. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला तेव्हाही ते सदस्य होते. त्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात आलो, तेव्हाही ते आमदार होते. त्यामुळे विधानसभेचा कार्यकाळ संपला या कारणावरून अपात्रतेच्या याचिका निष्फळ ठरतात हा शिंदेंचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही
शिंदेंनी व्हीप बजावल्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. मात्र, न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या उत्तरात ई-मेलबाबत काही बाबी मान्य केल्या आहेत. प्रत्येक आमदाराला कोणत्या ई-मेल आयडीवर नोटीस पाठवण्यात आली, याची माहिती कोर्टात दिली आहे. सर्व आमदारांना त्याच ई-मेल पत्त्यांवर नोटीस बजावण्यात आल्याचे स्पष्ट होते.
शिंदेंसोबतच्या 37 आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले. त्यावेळी राजन साळवी हे दुसरे उमेदवार मैदानात होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या सरकारच्या बाजूने शिंदेंसोबतच्या सर्व आमदारांनी मतदान केले. त्यांनी सरकारच्या बाजूने विश्वासदर्शक ठरावाला समर्थन दिले. व्हीप बजावण्यात आल्याचा पुरावा म्हणून याचिकाकर्त्याने शिंदेंच्या उत्तरातील कबुलीचा आधार घेतला आहे. यासंदर्भातील प्रतिवादींचे उत्तर मी न्यायालयाला दाखवले आहे.
कपिल सिब्बल
याचा अर्थ असा होतो का की, प्रत्येक वेळी पक्षांतरासंदर्भात नवी घटना घडली तर मला अपात्रतेसाठी स्वतंत्र याचिका दाखल करावी लागेल? एकनाथ शिंदे यांनी बंड करून वेगळा गट स्थापन केला आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. जर शिंदे हे शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री असतील, तर संपूर्ण राजकीय पक्ष त्यांच्यासोबत गेला पाहिजे, असा त्यांचा दावा आहे
केवळ विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर संपूर्ण राजकीय पक्ष आपलाच असल्याचा दावा कसा काय करता येईल? आमदारांचे बहुमत तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्हीच खरी शिवसेना ठरता, असा युक्तिवाद कोणत्या घटनात्मक आधारावर केला जात आहे? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.
कपिल सिब्बल
या सर्व घटनांचा एकत्रित विचार केला, तर शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मूळ पक्षाविरोधात विरोधात कारवाया केल्या आणि महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पक्षांतर घडवून आणले, असा निर्विवाद निष्कर्ष निघतो. सुरुवातीपासून आमची हीच भूमिका आहे. शिंदेंचा दावा आहे की, या याचिकेनंतर घडलेल्या घटना या नंतरच्या आहेत. त्यामुळे त्यांचा अपात्रतेच्या याचिकेत आधार घेता येणार नाही. पण या युक्तिवादामागे नेमका तर्क काय आहे, असा सवाल सिब्बल यांनी केला
कपिल सिब्बल
ठाकरेंनी 23 जून रोजी दाखल केलेल्या पहिल्या अपात्रता याचिकेत नेमकी कोणती भूमिका मांडली होती, हे मी आपल्या निदर्शनास आणून देतो. शिंदे आणि त्यांच्या अन्य आमदारांनी भाजपसोबत संगनमत केले होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी आपल्या मूळ राजकीय पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न केले. हे सर्व त्यांनी स्वार्थी आणि भ्रष्ट हेतूने केले, असा आमचा आरोप होता
अपात्रतेच्या कार्यवाहीत संबंधित आमदाराने आपल्या वर्तनातून स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे का हे विधानसभा अध्यक्षांना ठरवायचे होते. यामध्ये आमदाराचे वर्तन महत्त्वाचे आहे. मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोणता गट करतो, याबाबत प्राथमिक निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो. ज्या दिवशी पक्षांतराची कृती प्रथम घडली, ती तारीख म्हणजे 21 जून त्यामुळे त्या दिवशी मूळ राजकीय पक्ष कोणाचा होता, हे ठरवणे आवश्यक आहे
ठाकरेंच्या मूळ मुद्द्यांवर शिंदेंनी जाणीवपूर्वक उत्तर देणे टाळले आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत होणारी कार्यवाही या दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र आहेत.
कपिल सिब्बल -
21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या आदेशात शिंदे गटाच्या 26 जूनच्या ठरावाचा आधार घेतला. या ठरावाला 31 आमदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद करून विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढला.
कपिल सिब्बल
विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत होणारी कार्यवाही या दोन्ही स्वतंत्र आणि वेगळ्या आहेत. विधानसभा अध्यक्षांना हे ठरवायचे होते की, एखाद्या सदस्याने स्वतःच्या कृतीतून स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे का आणि त्यामुळे तो अपात्र ठरतो का. यासाठी संबंधित सदस्याचे वर्तन महत्त्वाचे आहे. मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोणता गट करतो, याचा प्राथमिक निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात
कपिल सिब्बल
समजा, सरकारमधील सत्ताधारी पक्षाचे बहुमत केवळ चार-पाच आमदारांचे आहे. अशा परिस्थितीत एका पक्षाचे सहा आमदार पक्षाच्या भूमिकेशी असहमती दर्शवून दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात. त्यामुळे सरकारचे बहुमत कोसळू शकते. अशा कृतीला पक्षांतर किंवा बंडखोरी म्हणायचे की स्वसंरक्षणाची कृती? अशा प्रकारच्या राजकीय खेळीचे न्यायालयाने गांभीर्याने परिणाम तपासले पाहिजेत
एखाद्या राजकीय पक्षाला सत्ता मिळवायची असेल किंवा सरकार स्थिर ठेवायचे असेल, तर बहुमताचे स्वरूप लक्षात घेऊन अशा राजकीय हालचाली केल्या जातात. सध्या जे घडत आहे, ते याचाच भाग आहे.
यानंतर कपिल सिब्बल म्हणाले की, त्यांनी न्यायालयासमोर प्राथमिक भूमिका मांडली असून आता ते आपल्या लेखी युक्तिवादाकडे येऊ इच्छितात
सिब्बल -
मात्र यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला त्यांच्या सरकार कोसळले
मग शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले
हे सरकार 2019 ते 2022 कार्यरत होते
मग या काळामध्ये शिंदे काय करत होते ?
या काळात त्यांना अडचणी नव्हत्या का ?
असे सवाल सिब्बल यांनी उपस्थित केले
सिब्बल -
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 21 नोव्हेंबर 2019 रोजी झाली
यानंतर निकाल जाहीर झाले
यानंतर भाजपने राज्यपालांनी पाठवलेले सरकार स्थापनेचे निमंत्रण स्वीकारले नाही
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत जाऊन सरकार स्थापन केले
पहाटेच्या शपथविधीची घटना कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगायला सुरुवात केली
मग निवडणूक पूर्व युती कुठे होती? असा सवाल सिब्बल यांनी विचारला
कपिल सिब्बल - विधानसभा अध्यक्षांनी आपल्या आदेशात 58 पैकी 31 खासदार शिंदेंकडे असल्याने त्यांनाच राजकीय पक्ष असल्याचे घोषित केले'
शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु
ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला सुरू
असीम सरोदे यांनी सांगितलं आहे की, "ध्रुव मेहता, सिंग आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद करताना जणू काही उद्धव ठाकरे यांचंच सगळं चुकलं आहे, मत मानणाऱ्या नेत्यांचं चुकलं आहे अशी मांडणी होत होती. त्यामुळे त्यांनी वागणूक कोणाची तपासणार आहात? पक्षाविरोधी कारवाई केली त्यांची की जे पक्षातच आहेत, नेतृत्व आहेत हा मुद्दा उपस्थित केला".
"दहाव्या अनुसूचित पक्षांतरबंदी कायद्यात सांगितलं आहे की, जो पक्षविरोधी कारवाई करेल तो तशी कृती करण्यासाठी अपात्र आहे. त्यामुळे त्याने दुसरी पात्रता दाखवण्याची गरज नाही. क्रॉस व्होटिंग केलं तेव्हाच ते अपात्र ठरले हा मुद्दा अधोरेखित करायचा होता. 22 जूनला सुनील प्रभू यांची व्हिप म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांचा व्हिप अधिकृत असताना मान्य न करणं योग्य आहे का हादेखील मुद्दा आहे," असं ते म्हणाले आहेत.