SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सप्तपदी झाली, थाटात लग्न झालं घरी जाण्याऐवजी वधू-वरासह 27 वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?

मुंबईतील भांडुप परिसरातील एका विवाहसोहळ्याचे आनंदाचे वातावरण क्षणात गोंधळात बदललं. वधू-वरासह 27 वऱ्हाडी हॉस्पिलटमध्ये पोहोचले.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 01:20 PM IST | Updated: Nov 02, 2026, 01:23 PM IST
Image Credit: Mumbai Bhandup
Join

एका लग्नसोहळ्यात आनंदाचे वातावरण क्षणात चिंतेत बदलले. मुंबईतील भांडुप परिसरातील एका लग्न समारंभात नवरा -नवरीसह जवळ 27 पाहुण्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. लग्न सोहळ्यातील जेवण्यानंतर सर्वांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. धक्कादायक या पाहुण्यांमध्ये सात लहान मुलांचाही समावेश आहे.

मुलुंडमधील अग्रवाल महापालिका रुग्णालयात या सगळ्यांवर उपचार सुरु आहे. रात्री सुमारे 11.40न नंतर एकापाठोपाठ एक रुग्ण येत होते, त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, रुग्णालयात सध्याच्या स्थितीत 27 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये 11 महिला, 9 पुरुष आणि 7 लहान मुलांवर उपचार सुरू आहे.

डॉ. मारस्कोले सांगितलं की, "सर्व रुग्णांना जेवणानंतर उलट्या, जुलाब आणि अपचनाचा त्रास सुरु झाला होता. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांना लग्नातील जेवण्यातून विषबाधा झाली. महाबोधी रत्नविहार हॉलमधील लग्नात दुधापासून बनवलेली मिठाई 'खरवास' खाल्ल्यानंतर सर्वांना विषबाधा झाली.

 

 

तर वराच्या नातेवाईकांने सांगितलं की, माझ्या मेहुण्याचे लग्न होतं. लग्नाचे सगळे विधी झाल्यानंतर घरी गेल्यावर अचानक महिलांची प्रकृती बिघडली. हा आकडा 30 ते 40 लोकांना एकच त्रास व्हायला लागला. कॅटरिंगच्या कर्मचाऱ्यांनी अन्नात काहीतरी खराब पदार्थ वापरले किंवा ते वाढले, त्यामुळे ही धक्कादायक घटना घडली.

 

 

दरम्यान पीडित कुटुंबाने  महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच मुंबई पोलिसांकडे या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच दोषीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES