SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार असून अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 28, 2026, 02:29 PM IST | Updated: Oct 28, 2026, 02:30 PM IST
Image Credit: Mumbai Metro Line
Join

मानपाडा-काटई नाका ते तळोजा, कल्याण फाटामार्गे, या 18.40 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका '12-अ'ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंगळवारी मंजुरी दिली. हा प्रकल्प पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता आणि 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल समितीपुढे सादर केला होता. मेट्रो '12-अ'मुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईदरम्यानची वाहतूक जोडणी अधिक सक्षम होणार आहे. औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्कही वाढणार आहे.

या मार्गिकेमुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ 40 ते 50 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा असल्याचे डॉ. मुखर्जी यांनी सांगितले. या मार्गिकेवर काटई नाका येथे मेट्रो मार्गिका 12 आणि बुलेट ट्रेन जोडमार्गाशी, काटई नाका ते कल्याण
फाटा दरम्यान मेट्रो मार्गिका 14शी, तर अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका 1शी जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर फीडर बससेवाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतूक ताण कमी होईल, खासगी वाहनांचा वापर घटेल आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनातही घट होईल, अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनताही
कमी होण्यास मदत होईल. 'एमएमआरडीए' या प्रकल्पाची एकात्मिक अंमलबजावणी करणार आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपुलासाठी प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली. तसेच, प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमिनी प्रकल्प विकास आणि निधी उभारणीसाठी 'एमएमआरडीए'कडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

कशी असेल मेट्रो मार्गिका 12 A

मार्गः मानपाडा - काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे)

एकूण लांबीः १८.४० किलोमीटर (संपूर्ण मार्ग उन्नत / Elevated)

स्थानके (Stations): मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडले गाव, कल्याण फाटा, गोठेघर गाव, दहिसर मोरी, दहिसर गाव, किरवली गाव, रोहिंजण आणि खुटारी गाव यांसह एकूण १२ उन्नत स्थानके

विशेष वैशिष्ट्य: या प्रकल्पात 15.62 किमी लांबीच्या एकात्मिक रस्ते उड्डाणपुलांचा (Integrated Road Flyovers) समावेश आहे, ज्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई दरम्यानची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES