SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रोहित पवार यांच्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, भाजपाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत गंभीर आरोप केला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 16, 2026, 19:20 IST | Updated: Nov 16, 2026, 19:29 IST
Image Credit: रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, भाजपाची मागणी
Join

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांच्या विमान दुर्घटना प्रकरणात विमान कंपनीचे मालक व्हीके सिंग यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे देवेंद्र फडणवीस रोहित सिंग यांना वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यानंतर भाजपाने रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं असून, पुरावे मागितले आहेत. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आदरणीय शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत मफलरवाले नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी अपघातामागे त्यांचा हात नाही हेदेखील स्पष्ट केलं. "ज्या व्यक्तीचे नाव घेणार आहे, ती व्यक्ती दादांच्या घातपातामागे आहे असे मी म्हणत नाही. व्हीएसआर कंपनीला मात्र तो वाचवत आहे," असं सांगत रोहित पवारांनी फडणवीसांचा मफलर घातलेला फोटो दाखवला.

"अपघातामागे त्यांचं काहीही घेणंदेणं नाही. मात्र, घातपात करणा-यांना ते वाचवतायत का?," असा सवाल त्यांनी विचारला आहे. रोहित सिंगच्या लग्नात फडणवीस गेले होते हे सांगताना त्यांनी काही व्हिडीओ, फोटोही दाखवले.

नवनाथ बन यांची पोस्ट

रोहित पवारांच्या आरोपांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देताना टीकाही केली आहे. रोहित पवार म्हणजे प्रसिद्धीची हाव असलेले हावरट व्यक्तिमत्त्व! आज स्व. अजितदादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी व्हावे, म्हणून केलेला हा उपक्रम, दुसरे काहीही नाही असं ते म्हणाले आहेत. 

"रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही 2013 पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला. केवळ रोहित सिंग याच्याशी नाही, तर अनेक वैमानिकांसोबत त्यामुळे सार्‍याच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशात कुणाच्या लग्नाला जाणे, ही सामान्य बाब आहे. अनेक वैमानिक आणि सहवैमानिकांसोबत त्यामुळे सार्‍याच नेत्यांचे फोटोही आहेत. एका फोटोवरुन असे आरोप करणे, हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण आहे. रोहित पवारांनी आज जे केले, त्यातून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला मातीत घातले आहे. याचा करावा तितका धिक्कार कमी आहे," असा संताप त्यांनी व्यक्त केला.  

 

 

आमची अजून एक मागणी आहे की, रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आदरणीय शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.


केशव उपाध्येंची टीका

"फोटो दाखवून राजकीय बॉम्ब फोडण्याचा आव आणू नका; जनता असल्या आरोपांचा भीक घालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय अस्तित्वाची लढाई आणि स्वतःचा वेगळा सवतासुभा उभा करण्याच्या नादात रोहित पवारांनी आता राजकीय सभ्यतेच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाण्याची ही धडपड महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे!," अशी टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

"राजकारणात अस्तित्व निर्माण करण्यासाठी कर्तृत्व लागते, केवळ फोटो दाखवून चालत नाही! प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेली ही स्टंटबाजी रोहित पवारांचे कुवत दाखवून देते!अजितदादांसारख्या लोकप्रिय नेत्याच्या दुर्दैवी विमान अपघाताचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी या घटनेचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याचा उद्योग सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिखलफेक करण्यासाठी एका फोटोचा आधार घेणे, हा राजकीय बेजबाबदारपणाचा कळस आहे," असंही ते म्हणाले आहेत.

 

 

पुढे त्यांनी म्हटलं की, "देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यातील मैत्री, विश्वास आणि राजकीय सहकार्याचा इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे. अशा मैत्रीच्या नात्यावर संशयाचे विष कालवण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःच्या राजकीय खुजेपणाचे प्रदर्शन आहे. एखाद्या कार्यक्रमातील फोटो दाखवून कोणाला गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? निराधार आरोपांच्या फैरी झाडून जनतेची दिशाभूल करणे बंद करा! प्रत्येक संवेदनशील घटनेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव गोवायचे, संशयाचे वातावरण निर्माण करायचे आणि त्यातून राजकीय प्रसिद्धी मिळवायची, हा तुमचा ठरलेला अजेंडा झाला आहे.अजितदादांच्या अपघाताचे सत्य निष्पक्ष तपासातून बाहेर आलेच पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण तपासाऐवजी राजकीय आरोपांचे नाट्य उभे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही".
 

यांचे डोके ठिकाणावर आहे का ? प्रवीण दरेकरांचा संताप

प्रसिद्धीच्या हव्यास, मस्ती एवढी डोक्यात जाईल असे आम्हाला वाटले नव्हते. ते शरद पवार यांचे नातू आहे पण त्यांची राजकीय परंपरा मातीत घालत आहेत. यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा संताप भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. "त्यांनी आरोपाचा अतिरेक केला आहे. अमाप प्रसिद्धी मिळेल म्हणून हे करत आहे. वेड्याच्या रुग्णालयात पाठवायला हवे मानसिक परिस्थिती कळेल. ही कंपनी अनेकांना विमान सेवा देत असते,. त्यातील एक फोटो दाखवून आरोप असे नीच आरोप करत आहे. उद्या मी ही कोणावर आरोप करेल आरोपात तथ्य असायला हवे," असं ते म्हणाले आहेत.

संदर्भ हीन बोलत आहे मफलर मॅन म्हणून बोलत होते कोणाचे नाव घेतात. पवार साहेब यांचे नाव काढले तर कोणी किंमत देणार नाही. आरोप करायला अक्कल लागत नाही. मी आरोप करू का घातपातामध्ये रोहित पवार होते. राजकारणासाठी कोणत्याही थराला जायचे हे सध्या सुरू आहे. त्यांचा भ्रम आहे त्याचा भोपळा फुटला त्यांची लायकी कळली आहे अशी टीका त्यांनी केली आहे. रोहित पवारांना चौकशीसाठी बोलवायला हवे अशी मागणीही त्यांनी केली आहे 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES