एका बाजूला राज ठाकरे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, दोघांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित राहिले. यावेळी हे तिनही प्रमुख राजकीय नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसले.
Maharashtra Politics: पदवीधर निवडणूक निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडलेली असतानाच आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपने नेते आशिष शेलार एकाच मंचावर उपस्थित राहले. यावेळी हे नेते एकमेकांसोबत चर्चा करताना दिसले. एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकाच मंचावर उपस्थित राहिले.
मुख्यमंत्री फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले आहेत. या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या एकत्रित उपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रगंली आहे. महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिनही प्रमुख राजकीय नेते एकाच कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिनही नेते एकत्र उपस्थित राहिले.
मतचोरी, एसआयआर प्रक्रिया, कर्जत वृक्षतोड यांसारख्या विविध मुद्द्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधक आणि ठाकरे बंधूंकडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात. अशातच पदवीधर निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलेली असताना हे तिन्ही नेते एका मंचावर येत असल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्यात.
दरम्यान या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना दिसले. कार्यक्रम सुरु असताना हे तीनही नेते एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. यावेळी सर्व नेत्यांच्या चेहऱ्यांवर हास्यरेषा पहायला मिळाल्या. एकमेकांवर टीका करणारे नेते जाहीर कार्यक्रमात एकमेकांसोबत हसत हसत चर्चा करत दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा कार्यक्रम जरी सांस्कृतीक असला तरी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.