SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

46 लाखांचे सिडकोचे घर, 10 महिने होऊनही विजेत्यांना ताबा नाही; काय आहे प्रकरण?

सिडकोच्या सोडतीत घर मिळाल्याने स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र 10 महिने होऊनही विजेत्यांना घराचा ताबा मिळालेला नाहीये.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 07, 2026, 11:28 AM IST | Updated: Oct 07, 2026, 11:30 AM IST
Image Credit: CIDCO lottery winners
Join

सिडकोच्या तळोजा सेक्टर 37 येथील विजयदुर्ग विस्टा प्रकल्पातील सोडत विजेत्यांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही. या नागरिकांनी डिसेंबर 2025 मध्ये घराची संपूर्ण किंमत भरली होती. 'एलआयजी' सदनिकांबाबत मार्चमध्ये न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ज्या सदनिकाधारकांनी घराची संपूर्ण किंमत आधीच भरली आहे आणि त्यांच्या सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे, अशांना तरी घरांचा ताबा द्यावा, अशी मागणी विजेत्यांकडून होऊ लागली आहे.

सिडकोने ऑक्टोबर 2024 मध्ये तळोजा सेक्टर 37 येथील अल्प उत्पन्न गटासाठी 398 चौरस फुटांच्या 816 आणि 540 चौरस फुटांच्या आठ सदनिकांची सोडत काढली होती. 398 चौरस फुटांच्या सदनिकेची किमत 34 लाख 20 हजार, तर 540 चौरस फुटांच्या सदनिकेची किंमत 46 लाख 40 हजार रुपये होती. रेराच्या नोंदणीनुसार ऑक्टोबर 2025 मध्ये सदनिकांचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र, बांधकाम पूर्ण होऊनही ताबा मिळाला नसल्याने विजेत्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

सिडकोच्या या प्रकल्पाचे भोगवटा प्रमाणपत्र 21 नोव्हेंबर 2025 रोजी तयार असल्याचे सांगण्यात सिडको सोडत विजेते घरांच्या प्रतीक्षेतआले होते. त्यामुळे डिसेंबर पासून घराचा ताबा मिळेल, अशी अपेक्षा सदनिकाधारकांना होती. मात्र, अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नसल्याने विजेते दर रविवारी इमारतीच्या आवारात बैठक घेऊन पुढील पाठपुराव्याचे नियोजन करीत आहेत. यामध्ये विधवा, वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी असलेले तरुण तसेच नोकरी करणाऱ्या दाम्पत्यांचा समावेश आहे.

अनेकांनी घराची 100 टक्के रक्कम सिडकोकडे भरली असून गृहकजांचे हप्तेही सुरू झाले आहेत. त्यामुळे स्वतःच्या घरात राहता येत नसतानाही कर्जाचा हप्ता आणि भाडे भरावे लागत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. सिडकोच्या सोडतीत घर मिळाल्याने स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ताबा रखडल्याने आनंदाऐवजी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना विजेत्यांनी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ताब्याची निश्चित तारीख मिळत नसल्याने सिडकोने भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या सदनिकांचा ताबा तातडीने द्यावा, अशी मागणी होत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES