• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुरासू चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले, वादळी वाऱ्यासह पाऊस, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांनाही यलो अलर्ट

मुरासू चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले, वादळी वाऱ्यासह पाऊस, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांनाही यलो अलर्ट

मुरासू चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले असून ताशी 120 किमी वेगाने वारे वाहत आहेत. महाराष्ट्रावर काय परिणाम होणार

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 03, 2026, 07:00 AM IST|Updated: Nov 03, 2026, 07:02 AM IST
joinshare
मुरासू चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले, वादळी वाऱ्यासह पाऊस, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांनाही यलो अलर्ट
Image Credit: Cyclone Murasu Live Updates

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'भारताने 5 हजार वर्षांपूर्वीच...'; एलन मस्कच्या फ्लाइंग कारवर रणबीर कपूर हे काय बोलून गेला?

'भारताने 5 हजार वर्षांपूर्वीच...'; एलन मस्कच्या फ्लाइंग कारवर रणबीर कपूर हे काय बोलून गेला?

2

'36 आमदार असतानाही तुम्ही...', पार्थ पवारांमुळे NCP मध्ये नाराजी; कोअर कमिटीच्या बैठकीत तक्रार?

3

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मास्टरमाईंड पंडितच्या घरातून 'त्या' महिलेला अटक

4

'मोदी-शहा वगैरे पंपूचे ‘लवणेन भोज्यम्’ करणारी...', शिवसेनेकडून भाजपावर हल्लाबोल, शहांना म्हणाले 'टकलावरचे उरलेसुरले केस उपटत...'

5

आजचे राशीभविष्य 3 नोव्हेंबर 2026 : मेष - मिथुनला भाग्याची साथ, कर्कला आर्थिक लाभ तर कुंभ राशीच्या लोकांना जॉब ऑफर, कसा आहे आजचा मंगळवार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मुरासू चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर होणार आहे. राज्यात वादळी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील या विभागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (APSDMA) दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ मुरासू किनारपट्टीला धडकले असून दोन तास मुसळधार पाऊस बरसणार आहे. तसंच, सध्या किनारपट्टीवर 120 प्रति किमीच्या वेगाने वादळी वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळं किनारपट्टीवर 1 ते 1.5 मीटर उंच लाटा उसळल्या आहेत.  या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित ठिकाणीच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे निर्देश आंध्र प्रदेश सरकारने दिले आहेत.

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. मात्र उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नोव्हेंबरमध्येही बसणार उन्हाचे चटके

ऑक्टोबर महिन्यात राज्यातील बहुतांश भागांत नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला. आता नोव्हेंबर महिन्यातही उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रशांत महासागरातील 'एल निनो' स्थितीची तीव्रता आगामी काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम देशातील तापमानावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरही तापदायक जाणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cyclone Alert
Weather News
Maharashtra News