बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. अशातच मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मास्टरमाईंड अनिल पंडितच्या अगदी जवळचा व्यक्तीला अटक केली आहे. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने 22 वर्षीय तरुणीला अटक केली असून ती अनिल पंडितची वहिनी आहे. 1 नोव्हेंबर मुंबई गुन्हे शाखेने हरियाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. या अटकेनंतर टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही 13 वर गेली आहे.
Mumbai Crime Branch has arrested Suneha Pandit, sister-in-law of main conspirator and gang leader Anil Pandit, from Karnal, Haryana, in the Tiger Shroff firing case. She allegedly helped fund the attack on Anil Pandit's instructions by transferring money through bank accounts, including to accused Amar Mundelia. The Crime Branch is investigating the money trail and will seek her remand before the MCOCA court. Anil Pandit, also wanted in the case, remains absconding, and a search is underway.
— IANS (@ians_india) November 2, 2026
