महाराष्ट्राच्या पोलीस विभागात मोठे खांदेपालट करण्यात आले आहे. एकाचवेळी 18 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 काढले आहेत. महाराष्ट्र राज्यभरातील डीसीपी (DCP) आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिली गेले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे तीन पोलीस अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात कोकण परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, ठाणे शहराचे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंग जाधव आणि ठाणे शहर परिमंडळ 5 पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम यांच्या समावेश आहे.

अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून अनमोल मित्तल (भापोसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पूर्वी ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक होते. तर अंबाजोगाईच्या विद्यमान अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूरला बदली झाली आहे. चेतना तिडके यांच्याकडे पोलीस अधीक्षक (अभियान, अंमली पदार्थविरोधी) पथकाची जबाबदारी देण्यात आली.

अनमोल मित्तल हे 2021 च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरमधील भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. अंबाजोगाईमध्ये बदलीनंतर त्यांच्यावर अंबाजोगाई विभागातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे लागणार आहे.