पुण्यातील मुकुंदनगर परिसरात एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या उच्चशिक्षित विवाहित आणि शहरातील नामांकित 'झांबरे पॅलेस'चे मालक यांची सून पायल अक्षय झांबरे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पायलने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. पायलच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण शहर हादरून गेलंय. नेमकं आदल्या रात्री काय झालं याचा खुलासा पायलच्या भावाने केला आहे.
पायल अक्षय झांबरेचा मृतदेह शेजारच्या बंद फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर खळबळ माजली आहे. मृतदेह सापडल्या त्या सकाळी आणि आदल्या रात्री काय झालं याचा खुलासा पालयच्या भावाने केला आहे. तो म्हणाला की, आम्हाला सकाळी साडेसात वाजता फोन आला. तुझी बहीण दिसत नाहीय. मग आम्ही त्यांच्या झांबरे कुटुंबियांच्या घरी आलो. तर सासू - सासरे आणि तिचा नवरा अक्षय आरामात बसले होते. त्यांना काही देणं घेणं नव्हतं, असे बसले होते. आम्ही विचारतोय तर काही सांगायला तयार नव्हते. मग ते उठले आणि बाहेर गेले आणि शोधतो म्हणाले आम्ही इकडे स्वारगेट परिसरात गाडीतून गेले. त्यानंतर पाचच मिनिटात आले आणि म्हणाले इकडे फ्लॅटवरती आहे. मग आम्ही फ्लॅटवरती आलो तर दार बंद होते. मग मी मागच्या बाजूने चढून गेला आणि दरवाजा फोडला. तिथे ती मृतवस्थेत दिसल्यावर हे तिघ तिथून पळून गेलेत.
भावाने सांगितलं की, तिने आदल्या रात्री फोन आणि मेसेज करून सांगितलं होतं की, मला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सासूसोबत वाद सुरू आहे. त्यावर मी तिच्या नवऱ्याला अक्षयला फोन केला होता. तेव्हा तो म्हणाला काही सासू सुनेचे वाद सुरू आहे, काही होईल सगळं ठीक. आधीपण त्या दोघेंचे अनेक वाद झाले आहे. तेव्हा आम्ही यायचो त्यानंतर बोलून ते वाद मिटायचे. आम्हाला वाटल यावेळीही ठीक होईल. त्यांनी फोन बंद करून ठेवला होता. मी पायलच्या सासऱ्यालाही रात्री साडेअकरा बारा वाजता. त्यांनी फोन उचलला नाही. मग सकाळी फोन आला की तुझी बहीण दिसत नाहीय. पायलच्या सासरच्या मंडळीने सांगितलं की, पायल रात्रीच घरातून निघून गेली होती. पायलला तिच्या सासू - सासरे आणि नवऱ्यानेच संपवलं, असा पायलच्या घरच्यांचा गंभीर आरोप आहे.
#WATCH: Angry relatives of 30-year-old Payal Zambre, found dead at her Mukund Nagar flat in #Pune, pelted her in-laws' house with stones following the incident. Family has alleged dowry harassment. Her husband & in-laws have reportedly gone missing. Police investigation underway. https://t.co/nlTvZcEZ20
— Varad Bhatkhande | Journalist (@VaradBhatkhande) November 2, 2026
पायलच्या घरच्यांनी सांगितलं की, सासरच्या लोकांना सोन्याची हाव होती. ते पायलच्या शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. दर दिवाळीला 5 ते 10 तोळे सोन्याची मागणी करायचे. यंदा आम्ही म्हटलं की आम्हाला शक्य नाही. ती पूर्ण न झाल्याने पायलचा अमानुष छळ करून त्यांची हत्या करण्यात आली, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. पायल यांचा मृतदेह समोर येताच पती अक्षय झांबरे, सासू आणि सासरे बाबासाहेब झांबरे घटनास्थळावरून पसार झाले होते. पण रात्री उशिरा पोलिसांनी अक्षय झांबरेला अटक केली आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अक्षय, सासू, सासरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.