• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /जयंत पाटलांना धक्का! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकरांचा मोठा विजय; रणनिती भेदत जिल्हा बँकेत दणदणीत एंट्री

जयंत पाटलांना धक्का! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकरांचा मोठा विजय; रणनिती भेदत जिल्हा बँकेत दणदणीत एंट्री

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा दणदणीत विजय झाला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 03, 2026, 09:40 AM IST|Updated: Nov 03, 2026, 09:58 AM IST
joinshare
जयंत पाटलांना धक्का! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकरांचा मोठा विजय; रणनिती भेदत जिल्हा बँकेत दणदणीत एंट्री
Image Credit: सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय!

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'मुलीला वेडी बोलायचा, तक्रार करणार ऐकल्यानंतर घाबरला अन् त्यानंतर...', विद्यार्थ्याने चिमुरडीवरील केलेल्या हल्ल्याचं खरं कारण उघड

'मुलीला वेडी बोलायचा, तक्रार करणार ऐकल्यानंतर घाबरला अन् त्यानंतर...', विद्यार्थ्याने चिमुरडीवरील केलेल्या हल्ल्याचं खरं कारण उघड

2

समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा, सरकारी अभियंत्यालाच लुटले, पिस्तुलाचा धाक दाखवला अन् इनोव्हा कार पळवली...

3

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत फसवणूक! एक नाही दोन नाही तब्बल 6 वेळा घडली घटना, नेमकं काय घडलं?

4

दोन हेलिकॉप्टरची हवेतच एकमेकाला धडक; कॅमेऱ्यात LIVE कैद झाली दुर्घटना, कोसळून खाली प्रवाशांवर पडणार इतक्यात...

5

जयंत पाटलांना धक्का! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकरांचा मोठा विजय; रणनिती भेदत जिल्हा बँकेत दणदणीत एंट्री

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. गोपीचंद पडळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विनोद पवार यांच्यात ही लढत होती. गोपीचंद पडळकर यांना 54 मते पडली, तर महाविकास आघाडीचे विनोद पवार यांना 34 मते पडली. जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांचा 20 मतांनी विजय झाला आहे.  पडळकरांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर पडळकर समर्थकांचा जल्लोष सुरु आहे. जिल्हा बँकेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी दणदणीत एन्ट्री केली आहे.

जयंत पाटलांना धक्का

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेचे चित्र बिनविरोध निवडीच्या गणितामुळे स्पष्ट झालं होतं. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांची निवडणूक जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लक्षवेधी ठरली होती. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर,असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला. पडळकरांची जिल्हा बँकेत एंट्री रोखण्यासाठी जयंत पाटलांची रणनीती पाहायला मिळाली., त्यामुळे जयंत पाटलांची रणनीती पडळकर कशी भेदणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर गोपीचंद पडळकरांनी आपल्या विजयाचा गुलाल उधळत धक्का दिला आहे. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली आहे. खरंतर निवडणूक बिनविरोध झाली आहे. जिल्हा बँकेत सर्वपक्षीय सत्ता असणार हेदेखील स्पष्ट आहे. जयंत पाटलांनी, भाजपासह सर्व पक्षांना घेऊन निवडणूक बिनविरोध केली मात्र बिनविरोधाच्या खेळीमध्ये आपले कट्टर विरोधक गोपीचंद पडळकरांना पद्धतशीर चार हात लांब ठेवले. ज्यामुळे जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांना मैदानात उतरावं लागलं. आमदार जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांच्यातील हाडवैर,सांगली जिल्ह्यातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकर यांना एन्ट्री मिळणार का ? अशी चर्चा रंगली होती.

कारण गोपीचंद पडळकर यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कथित भ्रष्टाचारावर नेहमीच आरोप करत प्रशासक आणण्यापासून बँकेच्या चौकशीची मागणी करत जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंत पाटलांना नेहमीचं टार्गेटवर ठेवले.
त्यामुळे पडळकरांसाठी ही निवडणूक सोपी राहणार नाही,हे उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतरच स्पष्ट झालं होते. कारण त्यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसच्या माजी आमदारांनी आक्षेप घेतला,मग हायकोर्टात पडळकरांचा अर्ज अवैध ठरला,पण पडळकरां सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकीचा मार्ग मोकळा करून घेतला.

जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत दोन्ही राष्ट्रवादी,काँग्रेस, भाजपा, शिंदे सेना,अशा सर्वांनी एकत्रित येत 21 पैकी 15 जागा बिनविरोध केल्या आहेत.

एक नजर टाकूया बिनविरोधाच्या पक्षीय बलाबलवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष - 4

भाजपा - 4

काँग्रेस - 4

शिवसेना शिंदे पक्ष - 3

अजितराव घोरपडे यांचा विजय

कवठेमंकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय झाला आहे. 
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे टी व्ही पाटील यांचा त्यांनी पराभव केला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना पडली 37 मते , तर टीव्ही पाटील यांना 33 मते पडली.  4 मतांनी माजी मंत्री अजित घोरपडे यांचा विजय झाला आहे.

अण्णासाहेब कोरे विजयी

मिरज सोसायटी गटातून काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे विजयी झाले असून, भाजपाच्या अनिल शेगुनशे यांचा पराभव केला.

संजयकाका पाटलांचा विजय

तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय झाला आहे. 
अटीतटीच्या निवडणुकीत १ मताने संजय काका पाटलांचा विजय झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव झाला आहे. माजी संजयकाका पाटलांना 39 मते पडली, तर माजी आमदार सुमनताई पाटील यांना 38 मते पडली. 
आमदार रोहित पाटील यांना मोठा धक्का आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विजयामुळे अखेर संजयकाका पाटलांना लागला गुलाल उधळला आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jayant Patil
Gopichand Padalkar
Sangli