• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /इडली, पोहे, लेमन राईस, अन् बरंच काही..., मुंबई- बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेसचा फूड मेन्यू पाहाच, तिकीट दर ते स्थानके, A To Z सगळं जाणून घ्या!

इडली, पोहे, लेमन राईस, अन् बरंच काही..., मुंबई- बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेसचा फूड मेन्यू पाहाच, तिकीट दर ते स्थानके, A To Z सगळं जाणून घ्या!

बहुप्रतिक्षित बंगरूळ मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस एक नोव्हेंबरला उद्घाटन झाले असून तीन नोव्हेंबरपासून रेल्वे नियमित होणार आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 03, 2026, 09:14 AM IST|Updated: Nov 03, 2026, 09:16 AM IST
joinshare
इडली, पोहे, लेमन राईस, अन् बरंच काही..., मुंबई- बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेसचा फूड मेन्यू पाहाच, तिकीट दर ते स्थानके, A To Z सगळं जाणून घ्या!
Image Credit: Mumbai-Bangalore Vande Bharat Sleeper

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'मुलीला वेडी बोलायचा, तक्रार करणार ऐकल्यानंतर घाबरला अन् त्यानंतर...', विद्यार्थ्याने चिमुरडीवरील केलेल्या हल्ल्याचं खरं कारण उघड

'मुलीला वेडी बोलायचा, तक्रार करणार ऐकल्यानंतर घाबरला अन् त्यानंतर...', विद्यार्थ्याने चिमुरडीवरील केलेल्या हल्ल्याचं खरं कारण उघड

2

समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा, सरकारी अभियंत्यालाच लुटले, पिस्तुलाचा धाक दाखवला अन् इनोव्हा कार पळवली...

3

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत फसवणूक! एक नाही दोन नाही तब्बल 6 वेळा घडली घटना, नेमकं काय घडलं?

4

दोन हेलिकॉप्टरची हवेतच एकमेकाला धडक; कॅमेऱ्यात LIVE कैद झाली दुर्घटना, कोसळून खाली प्रवाशांवर पडणार इतक्यात...

5

जयंत पाटलांना धक्का! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकरांचा मोठा विजय; रणनिती भेदत जिल्हा बँकेत दणदणीत एंट्री

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई आणि बंगळुरूदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी करणारी वंदे भारत शयनयान एक्स्प्रेसचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच पार पडले. 3 नोव्हेंबरपासून नियमित प्रवासी सेवादेखील सुरू होणार आहे. मुंबईतील पहिली वंदे भारत शयनयान एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस (बंगळुरू) यादरम्यान धावणार आहे. या गाडीमध्ये तृतीय श्रेणी आहे. मुंबई- बेंगळुरू एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर चर्चा आहे ती एक्स्प्रेसमध्ये देण्यात आलेल्या फूड मेन्यूची.

मुंबई- बेंगळुरू स्लीपर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवासादरम्यान प्रादेशिक खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना ऑनबोर्ड केटरिंग सेवांचाही आनंद घेता येणार आहे. मुंबई-बंगळुरू स्लीपर एक्सप्रेसमुळं मुंबई आणि बेंगळुरू या दोन्ही महत्त्वाच्या शहरांतील अंतर कमी होणार आहे. रात्रीचा लांबचा प्रवास अधिक अरामदायी आणि तणावमुक्त होणार आहे.

आयआरसीटीसीनुसार, एसएमव्हीटी बंगळूरु - सीएसएमटी मुंबई - एसएमव्हीटी बंगळूरु वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात विविध प्रादेशिक पदार्थ दिले जाणार आहेत.

असा असेल फूड मेन्यू

सकाळचा चहा

- चहा, कॉफी, ग्रीन टी (प्रीमीक्स) विनंतीनुसार साखरविरहित देखील मिळेल
- 2 ब्रँडेड डायजेस्टिव्ह बिस्किटे किंवा कुकीज मिळतील

नाश्ता (ब्रेकफास्ट)

इडली आणि सांभार, मसाला पोहे, केशरी भात, व्हेज कटलेट, दोन अंड्यांचे ऑमलेट, सकाळचा चहा

रात्रीचे किंवा दुपारचे जेवण (Dinner / Lunch)

- लेमन राइस किंवा स्टीम्ड राइस / जीरा राइस
- चपाती किंवा पराठा / पूरी आणि रोटी
- कर्नाटक पद्धतीचा का सांभर किंवा फोडणीचे वरण / दाल तडका
- पनीरची भाजी, एक प्रादेशिक पदार्थ किंवा चिकनही दिले जाणार
- दही किंवा लोणचं

मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचे भाडे किती?

मुंबई-बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस आठ स्थानकांवर थांबेल. अनंतपूर, गुंटकल, रायचूर, यादगीर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण अशी आठ स्थानके आहेत.

बंगळुरू-मुंबई थर्ड एसीचे भाडे- 2,810 रुपये
सेंकड एसीचे भाडे- 3,630 रुपये
फर्स्ट एसीचे भाडे- 4,450 रुपये इतके आहे.

प्रवासाचा वेळ वाचणार

या गाडीमुळे मुंबई-बंगळुरू प्रवासासाठी लागणारा वेळ सुमारे 24 तासांवरून 16 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News
Railway News
india