SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'प्रसिद्धी मिळवण्यासाठी...', टिपू सुलतान वादावर धिरज देशमुखांचा पलटवार, 'आम्ही सर्वधर्म समभाव...'

काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या टिपू सुलतान यांच्याबाबतच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अशातच धिरज देशमुखांनी यांनी झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 19, 2026, 19:44 IST | Updated: Nov 19, 2026, 19:47 IST
Image Credit: Dheeraj Deshmukh Exclusive
Join

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमधील जिल्हा बँकेची निवडणूक सध्या चर्चेत आहे. या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने दणदणीत विजय झाला आहे. 19 पैकी 14 जागांवर सहकार पॅनलने बाजी मारली पुन्हा एकदा लातुरमध्ये आपलंच वर्चस्व असल्याचे स्पष्ट केलं आहे. या विजयाबद्दल आणि अमित देशमुख यांच्या वादग्रस्त विधानावर धिरज देशमुख यांनी झी 24 तासावर विशेष मुलाखातीत आपली मतं मांडले आहेत.

धिरज देशमुख म्हणाले की, अमित देशमुखांच्या भाषणातील अर्धवट माहिती दाखवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा पलटवार धीरज देशमुख यांनी विरोधकांवर केलाय. अमित देशमुखांच्या भाषणाचा मागचा पुढचा भाग काढून हवं तेवढंच दाखवलं जातंय. त्यांनी भाषणाची सुरुवात शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने केली आहे. ज्यांनी कोणी भारताच्या लढाईमध्ये सहभाग घेतला असावा असा सर्व लोकांचा त्यांच्याबद्दलची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी टिपू सुलतान वादावर दिलीय.

निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक निवडणूक ही कठीण किंवा सोपी विश्लेषण न करता जी एक जबाबदारीची मोहीम असते आपण केलेले काम हे लोकांपर्यंत पोहोचले. शिवाय येत्या काळात आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचले, त्यातून त्यांनी आम्हाला हा विजय दिला आहे. लोकांकडून सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत मिळालं.

भाजपचे जिल्हा बँक निवडणुकीत प्रवेश यावर धिरज देशमुख म्हणाले की, हे जिवंत लोकशाहीचे उदाहरण आहे. विरोधीपक्षालाही लोकांनी संधी दिलेली आहे. जिल्ह्यातील लोकांच्या समस्या सोडवणे आणि सहकारातून सहकारी भूमिकेत जेव्हा बोर्ड तिथे बसेल तर सर्वांना घेऊन काम करण्याची भूमिका आमची नेहमी राहिलेली आहे. फक्त याला पक्षीय बलाबल न बघता एक बोर्ड एक संघ काम करेल या भूमिकेतून आपण पाहिलं तर सहकारात सहकाराची भूमिका राजकारण असलं पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्या सभासद, शेतकरी आणि गरजेसाठी मतपुरवठा ही बँक करते. त्याला अजून चांगल्या पद्धतीने काम करावे याबद्दल आम्ही पुढे पाहत आहोत.

जिल्हा बँक निवडणूक एवढी हायहोल्टेज ड्रामा का झाली, यावरही धिरज देशमुख यांनी झी २४ तासच्या विशेष मुलाखतीत भाष्य केलं. ते म्हणाले की, जेव्हा विरोधीपक्षाकडून कोणताही अँजेंडा नसतो, त्या निवडणुकीत आपण काय मुद्दे घेऊन जाणार, ज्या जिल्ह्यामध्ये चार दशकं काम करुन लोकांनी अनुभवलंय. लोकांनी विश्वासाने आतापर्यंत बोर्ड निवडून दिलेत. सध्याचा काळात निवडणुका या कामावर कमी आणि नको त्या मुद्द्यावर जास्त लढविल्या जातात. हेडलाइनमध्ये राहण्यासाठी निवडणूक विरोधकांनी लढवली. त्यामुळे जे काही जिल्ह्यात घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे नेहमीच या जिल्ह्यामध्ये विशेष महत्त्वाचे राहिले. कारण त्यांची सुरुवात ते तरुण असताना याच जिल्हा बँक निवडणुकीतून झाली आणि आज ते राज्याचे सहकार मंत्री आहेत. सहकारी मंडळातील बोर्डात आम्ही त्यांच्यासोबत पाच वर्ष काम केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तरुणी मंडळी तयार झालो आहेत. या निवडणुकीत आम्ही अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. गेल्या पाच वर्षात आम्ही राज्य, नॅशनलचे तेरा पारितोषिक आम्ही पटकवले आहेत. आम्ही कायम चांगलं काम केलं म्हणून ते नेहमीच आमच्यासोबत आहेत.

जेव्हा सहकारी निवडणुकी झाल्यात त्यात फार्म भरणे असेल फार्म मागे घेण्याची तारीख असेल ही एक प्रक्रिया आहे. जेव्हा काही उमेदवार माघार घेऊ पाहतात आपल्या पॅनलच्या प्रमुखांना सांगतात, त्यामागे त्यांची विशिष्ट्य कामं असतील. तिथे समन्वय आणि सहकार्याने गोष्टी होतात. काही उमेदवाऱ्यांनी स्वत:च्या मनाने फार्म मागे घेतला. त्यानंतर त्याच्याकडून अपहरण झाल्याचं वधवून घेणे. आम्ही पोलिसांनी सर्व फुटेज दाखवली, त्याने अर्ज मागे घेतला आणि तो सुखरूप घरी गेला. हे सर्व पोलिसांनी तपासलं त्यांना त्यात काही गैर सापडलं नाही.

निलंगेकर यांनी आरोप केला की देशमुख कुटुंब  बँकेचा निधी स्वतःच्या संस्थांकडे आणि जवळच्या लोकांकडे वळवल्याचा अगदी चित्रपटाकडे वळवतात. त्यावर धिरज देशमुख म्हणालेत की, ज्यांच्यावर सीबीआय चौकशी सुरु असल्याने त्यांचे नाव निवडणुकीकाळात समोर येऊ नयेत. अशाप्रकारचे आरोप केल्यावर लोक मूळ प्रकरण विसरून या मुद्द्याकडे लक्ष देतील. ज्यामुळे त्यांच्यावरील जे खटले न्यायालयात सुरु असतील. मला वाटतं ज्यांची नावं सीबीआयच्या चार्जशीटने टाकली असतील त्यांनी अशा निवडणुकीत उभंच राहायला पाहिजे का हे त्यांनी विचार करायला पाहिजे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES