• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया

हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई पालिकेच्या प्रदुषणमुक्त दिवाळी कॅम्पेनमधून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्यात आलाय. यानंतर दिया मिर्झाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 02, 2026, 03:28 PM IST|Updated: Nov 02, 2026, 03:46 PM IST
joinshare
हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया
Image Credit: दिया मिर्झा प्रतिक्रिया

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
IDBI बँकेचे खासगीकरण थांबवण्याची मागणी;  2,000 शाखांमधील 10,000 कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

IDBI बँकेचे खासगीकरण थांबवण्याची मागणी; 2,000 शाखांमधील 10,000 कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

2

'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?

3

हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया

4

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं निधन! झोपेत असतानाच आली फिट, मनोरंजन विश्वात खळबळ

5

तुम्ही दिवाळीच्या होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली? घरातून 12 लाखांचे दागिने लंपास, पोलिसही चक्रावले!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईत दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेनवरून नवा वाद निर्माण झालाय. अभिनेत्री दिया मिर्झा हिने नुकतंच दिवाळीनिमित्त जनजागृती करणारी पोस्ट शेअर केली होती.  दिवाळीत फटाके फोडणे टाळावे आणि ध्वनिप्रदूषण रोखावे, असे आवाहन करणारा दिया मिर्झाचा व्हिडिओ बीएमसीकडून शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या व्हिडीओवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नाराजी व्यक्त केली. अमित साटम यांच्या आक्षेपानंतर दियाचा हा व्हिडिओ हटवण्यात आला... 'दिवाळीबाबत दियाकडून धडे घेण्याची गरज नाही... 'आमच्या परंपरा आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत असं ट्विट साटम यांनी केलं होतं. आता दिया मिर्झाने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाली दिया मिर्झा?

'प्रदूषणमुक्त दिवाळी' कॅम्पेनभोवती निर्माण झालेल्या वादावर भाष्य करताना अभिनेत्री दिया मिर्झाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि बीएमसी (BMC) यांनी जनहितार्थ मला एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची विनंती केली होती, मग त्यावर कोणाला आक्षेप का असावा? असा प्रश्न दिया मिर्झाने उपस्थित केला. तसेच वायू प्रदूषण ही चिंतेची बाब आहे आणि प्रदूषण कमी करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचे स्वागतच केले पाहिजे, कारण हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे, असे दिया मिर्झाने पुढे म्हटले.

अपने पॉल्यूशन-फ्री दिवाली कैंपेन पर हुए विवाद पर एक्ट्रेस दीया मिर्जा ने ANI से कहा, "...किसी को उस वीडियो का विरोध क्यों करना चाहिए जिसे बॉम्बे हाई कोर्ट और BMC ने मुझसे जन हित में रिकॉर्ड करवाया है? वायु प्रदूषण चिंता का विषय है और प्रदूषण कम करने की सभी कोशिशों का स्वागत किया जाना चाहिए क्योंकि यह पब्लिक हेल्थ का मामला है..." (फाइल फोटो)

— ANI_HindiNews (@AHindinews) November 2, 2026

महापौर रितू तावडेंची आक्रमक भूमिका

या वादात आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही भूमिका मांडली आहे. आम्ही दिया मिर्झाला 100 टक्के ब्लॅकलिस्ट केल्याचे रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देश आणि हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना विरोध कायम असेल म्हटले. दिया मिर्झाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी बीएमसीच्या व्यासपीठावर तिला सहभागी करून घ्यायचे की नाही, हा निर्णय महापौर म्हणून आपला अधिकार असल्याचे तावडे यांनी सांगितले. या व्हिडीओबाबत आयुक्तांसोबत कार्यक्रम झाल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचेही स्पष्ट केले. दिवाळी कशी साजरी करायची हे दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये. तिने तिच्या वैयक्तिक प्लॅटफॉर्मवर काय वाटेल ते टाकावे पण बीएमसीच्या पोर्टलवर मी हे खपवून घेणार नाही, असे महापौर म्हणाल्या.


किशोरी पेडणेकरांची टीका 

किशोरी पेडणेकर यांनी महापौरांवर टीका केली.  महापालिका कामकाजात साटमांचा हस्तक्षेप कशासाठी?. महापौरांना अधिकार नसतील महापालिका बंद करा, असा घणाघात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय. दिया मिर्झाचं ट्विट का हटवले?, उत्तर द्यावं लागेल.महापालिका आयुक्तांना जाब विचारणार असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. कलाकरांमध्ये भेदभाव कसला करता?, असा थेट सवाल किशोरी पेडणेकरांनी केलाय. हिंदू-मुस्लीमशिवाय यांची दुकानदारी चालत नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलीय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News