• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?

'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?

Gautam Gambhir : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवण्यात आली. यात भारतीय संघाने 3-2 ने आघाडी घेत विजय मिळवला. हेड कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देत असताना तो म्हणाला की , 'मला कशाचीच भीती नाही...'.

Reported Bypooja pawar
Published: Nov 02, 2026, 03:30 PM IST|Updated: Nov 02, 2026, 04:16 PM IST
joinshare
'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?
Image Credit: 'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!

EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!

2

IDBI बँकेचे खासगीकरण थांबवण्याची मागणी; 2,000 शाखांमधील 10,000 कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

3

'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?

4

हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया

5

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं निधन! झोपेत असतानाच आली फिट, मनोरंजन विश्वात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा हेड कोच असणाऱ्या गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 3-2 ने टी20 सीरिज जिंकली. सीरिज  जिंकल्यावर गौतम गंभीर आत्मविश्वासाने भरलेला दिसला. त्याने सामना जिंकल्यावर पत्रकार परिषदेत खेळाडूंचं कौतुक केलं. गौतम गंभीरने मान्य केलं की त्यांच्यासमोर अनेक प्रकारची आव्हान होती. खेळाडू प्रवासामुळे आलेल्या थकव्यामुळे त्रस्त होते आणि परिस्थितीही वेगळी होती, तरीही त्यांनी मानसिकदृष्ट्या खंबीर राहून आपली आक्रमक शैली दाखवून दिली.

गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?

जेव्हा गौतम गंभीरला पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आलं की, तो त्याच्याकडे येणाऱ्या आव्हानांमुळे त्रस्त आणि किंवा घाबरला आहे. तर याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, 'मला कशाचीही भीती वाटत नाही. माझ्या आयुष्यात भीतीला स्थान नाही हा शब्द माझ्या शब्दसंग्रहात किंवा माझ्या विचारपद्धतीत कोठेही नाही. आम्ही व्यावसायिक आहोत. माझी नेहमीच अशी धारणा राहिली आहे की, कोणत्याही सबबी स्वीकारल्या जाणार नाहीत'.

पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या आणि वर्कलोड मॅनेजमेंटबाबत भाष्य केलं. त्याने म्हंटलं की, 'माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल, ती मी सर्वोत्तम पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. आमचे ध्येय सातत्याने चांगली कामगिरी करणे आणि संघ तसेच देशासाठी सातत्याने उत्तम परिणाम मिळवून देणे हे आहे'.

गौतम गंभीरने लागोपाठ झालेल्या क्रिकेट आणि व्यस्त शेड्युलवर चर्चा केली. याबाबत त्याने म्हटलं की, 'मला माहीत आहे की हे खूप कठीण आहे, पण मी याचा आनंद घेत आहे, कारण टीम इंडियाची जर्सी दुसऱ्यांदा परिधान करण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते'.

हेही वाचा : CSK ने 90 धावांची खर्च केले 14.20 कोटी, आता IPL 2027 पूर्वी संघातून रिलीज करणार 'हा' खेळाडू

भारताने 3-2 ने जिंकली टी20 सीरीज :

न्यूझीलंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची सीरीज टीम इंडियाने  3-2 ने आपल्या नावावर केली. सीरिजच्या सुरुवातीला तीन सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. जरी टीम इंडियाला शेवटच्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला, तरी त्यांनी न्यूझीलंडला जोरदार टक्कर दिली. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जाणार असून, तिची सुरुवात 4 नोव्हेंबरपासून होईल.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gautam Gambhir
Marathi News
Cricket News