IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग 2027 च्या नव्या सीजनसाठी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन होणार आहे. त्याच्या आधी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व संघांना त्यांची रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. त्याआधी पाचवेळची चॅम्पियन असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गोव्यात यंदा आयपीएल 2027 चं ऑक्शन पार पडणार आहे. क्रिकेबझच्या रिपोर्टनुसार सीएसके स्पिन ऑलराउंडर प्रशांत वीरला रिलीज करू शकते. प्रशांत वीरला मागच्या सीजनसाठी अबुधाबी येथे झालेल्या ऑक्शनमध्ये सीएसकेने 14.20 कोटींना खरेदी केले होते. उत्तर प्रदेशच्या प्रशांत वीर शिवाय विकेटकिपर फलंदाज असलेल्या कार्तिक शर्माला सुद्धा सीएसकेने 14 कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली होती. कार्तिकने सीएसकेसाठी 11 सामन्यात एकूण 295 धावा केल्या होत्या.
आयपीएल 2026 मध्ये प्रशांत वीरच्या परफॉर्मन्सबाबत बोलायचं झालं तर ते काही खास नव्हतं. प्रशांतने सीएसकेसाठी 6 सामने खेळले आणि 5 इनिंगमध्ये फक्त 90 धावा केल्या. प्रशांत गोलंदाजीत एकही विकेट घेऊ शकला नाही. हेच कारण आहे की फ्रेंचायझी प्रशांतला रिलीज करू शकते. अशाच प्रशांतला रिलीज केल्यावर सीएसकेचा संघ दुसऱ्या स्पिनर ऑलराऊंडरच्या शोधात असेल. रवींद्र जडेजाच्या संघातून गेल्यावर सीएसकेच्या संघाला त्याची कमतरता पूर्ण करू शकली नाहीये.
आयपीएल 2026 च्या आधी प्रशांत वीरने उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. प्रशांतने त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीने प्रभावित केले. सीएसकेमध्ये त्याला भविष्यातील एक आश्वासक खेळाडू म्हणून पाहिले जात होते, परंतु तो आपली संधी साधू शकला नाही. मात्र, असेही मानले जात आहे की प्रशांतला रिलीज केल्यामुळे, गोव्यातील ऑक्शन दरम्यान सीएसके त्याला पुन्हा कमी किंमतीत आपल्या संघात सामील करून घेऊ शकेल.