• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!

EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!

EPFO ची नवी व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू झालीय. आता पीएफ बॅलन्स, पासबुक आणि मागील 5 व्यवहार मोबाईलवर पाहता येणार आहेत. अधिकृत क्रमांक आणि वापरण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 02, 2026, 04:33 PM IST|Updated: Nov 02, 2026, 04:53 PM IST
joinshare
EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!
Image Credit: WhatsApp वर PF बॅलन्स

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!

EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!

2

'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स मोठ्या डीलच्या तयारीत

3

IDBI बँकेचे खासगीकरण थांबवण्याची मागणी; 2,000 शाखांमधील 10,000 कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

4

'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?

5

हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नोकरी करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने आपल्या 74 व्या स्थापना दिनानिमित्त व्हॉट्सअ‍ॅप वरून पीएफ खात्याची माहिती मिळवण्याची सुविधा सुरू केलीय. केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांनी या सेवेचे उद्घाटन केले. त्यानंतर आता पीएफ बॅलन्स, पासबुक आणि खात्यातील अलीकडील व्यवहार पाहण्यासाठी प्रत्येक वेळी ईपीएफओ वेबसाइटवर लॉगिन करण्याची गरज कमी होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या सुविधा मिळणार?

या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना चार प्रकारे मदत मिळणार आहे. पीएफ बॅलन्स:खात्यात सध्या किती रक्कम जमा आहे, हे पाहता येईल. खात्यात जमा झालेल्या योगदानाची माहिती मिळेल. खात्यातील अलीकडील पाच व्यवहार तपासता येतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेशी संबंधित पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स तपासण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

ही सुविधा वापरण्यासाठी पुढील प्रक्रिया करा.

मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा.
EPFO चा अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक +91 8796441800 सेव्ह करा.
त्या क्रमांकाचे व्हेरिफाइड व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडा.
संबंधित क्रमांकावरून ‘Hi’ असा मेसेज पाठवा.
स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांनुसार भाषा निवडा.
PF बॅलन्स, पासबुक किंवा मागील पाच व्यवहार यांपैकी आवश्यक पर्याय निवडा.
आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर खात्याची माहिती मिळवा. ही प्रक्रिया करताना ईपीएफओच्या खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच मेसेज करणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रातील नोकरदारांनाही मोठा फायदा

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते. विशेषतः नोकरी बदलल्यानंतर पीएफ खात्यातील जमा रक्कम तपासायची असल्यास किंवा कंपनीकडून नियमित योगदान जमा होत आहे का?, हे पाहायचे असल्यास ही सुविधा सोयीची ठरेल.

फसवणुकीपासून सावध राहा

EPFO च्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट किंवा मेसेजद्वारे फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घ्या. त्यामुळे केवळ अधिकृत क्रमांक आणि व्हेरिफाइड अकाउंटच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणालाही यूएएन पासवर्ड, ओटीपी, बँक खात्याचा पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नका. तसेच, सेवा सुरू झाल्यानंतर काही सदस्यांनी ओटीपी न मिळणे किंवा तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे पर्याय दिसत नसल्यास किंवा प्रतिसाद मिळत नसल्यास काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा, असे आवाहन करण्यात आलंय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
PF
EPFO