• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स मोठ्या डीलच्या तयारीत

'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स मोठ्या डीलच्या तयारीत

IPL 2027 Trade News : हार्दिक पांड्या आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार अशी माहिती समोर येत होती. त्यानंतर आता हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच्या ट्रेडसाठी मुंबई इंडियन्सने केकेआरकडून दोन स्टार खेळाडूंची डिमांड केली आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 02, 2026, 04:28 PM IST|Updated: Nov 02, 2026, 05:32 PM IST
joinshare
'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स मोठ्या डीलच्या तयारीत
Image Credit: 'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार!

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'तुकाराम मुंढे साहेब, फक्त दुकानदार टार्गेटवर का? राजकीय नेत्यांवर कारवाई दिवाळीआधी की नंतर?' व्यापाऱ्यांचा सवाल!

'तुकाराम मुंढे साहेब, फक्त दुकानदार टार्गेटवर का? राजकीय नेत्यांवर कारवाई दिवाळीआधी की नंतर?' व्यापाऱ्यांचा सवाल!

2

झी एंटरटेनमेंटमध्ये मोठा बदल; तुषार वोहरा यांची 'चीफ एआय अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर'म्हणून नियुक्ती!

3

EPFO वेबसाइटची गरज नाही; व्हॉट्सअ‍ॅपवर PF बॅलन्स कसा तपासायचा? सोप्या स्टेप्स!

4

'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स मोठ्या डीलच्या तयारीत

5

IDBI बँकेचे खासगीकरण थांबवण्याची मागणी; 2,000 शाखांमधील 10,000 कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IPL 2027 Trade News : आयपीएल 2027 च्या पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेला हार्दिक पांड्या हा ट्रेड होऊन दुसऱ्या संघात जाणार अशी चर्चा मागचा सीजन संपल्यापासून सुरु होती. आता पुन्हा एकदा ऑक्शन जवळ आल्यावर हार्दिकची कोलकाता नाईट रायडर्समध्ये जाण्याची चर्चा होऊ लागली आहे. रिपोर्ट्सच्या सांगण्यानुसार मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलीज करण्याच्या बदल्यात एक केकेआरकडून त्यांच्या दोन स्टार खेळाडूंची मागणी केली आहे. हे दोन खेळाडू म्हणजे स्टार फलंदाज अंगकृष रघुवंशी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा हे आहेत. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला नव्या कर्णधाराचा शोध आहे. या भूमिकेत हार्दिक एक मजबूत पर्याय म्हणून समोर आला आहे. मुंबई आणि केकेआर यांच्यातील हा व्यवहार जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती आहे. केवळ अंगकृश रघुवंशीच्या बाबतीत अडचण आहे. जर केकेआर त्याला सोडायला तयार झाले, तर हार्दिकच्या केकेआरमध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा होईल.

मुंबईने अंगकृष आणि हर्षितला मागितलं :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या बदल्यात हर्षित राणा आणि अंगकृष रघुवंशी या दोघांना आपल्या संघात घेऊ इच्छिते. मुंबईला भारतोयय विकेटकिपर फलंदाजांची गरज आहे. जी कमतरता अंगकृष दूर करू शकेल. हा युवा फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन करतोय. त्याला भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहिलं जातं आहे.

केकेआरसाठी महत्वाचे दोन खेळाडू :

हर्षित राणा हा केकेआरसाठी एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज राहिला आहे. 2024 मध्ये फ्रँचायझीला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत या खेळाडूंपैकी कोणालाही संघातून मुक्त करणे कोलकातासाठी सोपा निर्णय नसेल. विशेषतः अंगकृशच्या बाबतीत संघ द्विधा मनस्थितीत आहे. कारण आगामी हंगामात तो केकेआरच्या फलंदाजी फळीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

हेही वाचा : CSK ने 90 धावांची खर्च केले 14.20 कोटी, आता IPL 2027 पूर्वी संघातून रिलीज करणार 'हा' खेळाडू

कर्णधारपदासाठी हार्दिकची केकेआरवर नजर :

अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर केकेआर नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. हार्दिक पांड्या या जबाबदारीसाठी अगदी योग्य पर्याय आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आपल्या पहिल्याच सीजनमध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.  मात्र मुंबई इंडियन्ससोबतचा त्याचे मागील तीन सीजन चांगले राहिले नाहीत. मुंबईसोबतचा हा करार पूर्ण झाला तर हार्दिककडे केकेआरचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
IPL
Marathi News
Cricket News
Hardik Pandya