SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुम्ही दिवाळीच्या होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली? घरातून 12 लाखांचे दागिने लंपास, पोलिसही चक्रावले!

दिवाळीसाठी घरातील साफसफाईसाठी होम क्लिनिंग सर्व्हिस बुक करण्याचे प्रमाण वाढले आहे. याच एका होम क्लिनिंग सर्व्हिसकडून आलेल्या लोकांनी मुंबईतील एका घरात 12 लाखांचे दागिन्यांवर डल्ला मारला.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 02:52 PM IST | Updated: Nov 02, 2026, 02:55 PM IST
Image Credit: Mumbai Crime
Join

मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडमधील या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत. सगळीकडे दिवाळीची तयारी जोरदार सुरू आहे. आज महिलांही नोकरीवर जातात यामुळे घराची साफसफाई करण्यासाठी होम क्लिनिंग सर्व्हिसची मदत घेण्यात येते. पण एका घराला होम क्लिनिंग सर्व्हिस घेणे चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या घरात दिवाळीत दरोडा पडला आहे.

मालाड पश्चिम परिसरात ही घटना घडली आहे. झालं असं की, 26 ऑक्टोबर 2026 रोजी ऑनलाइन होम ट्रँगल ॲपवरून 52 वर्षीय महिलेने दिवाळीच्या साफसफाईसाठी होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली. या कंपनीने ठरलेल्या वेळेत चार कर्मचारी साफसफाईसाठी पाठवले. त्यांनी अतिशय छान प्रकारे घरातील स्वच्छता केली. त्यांचं काम झाल्यानंतर हे कर्मचारी गेले. त्यानंतर ही महिला बेडरूममध्ये गेल्या समजलं की, कपाटमधून सोनं - चांदीचे दागिने गायब झाले आहेत. यात 50 ग्रॅम सोन्याचा नेकलेस, 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बिस्किट आणि 500 ग्रॅम चांदीची वीट गायब झाली होती. त्या महिलेने सांगितलं या सगळ्याची किंमत 12 लाखांच्या घरात आहे.

महिलेने मालाड पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगून तक्रार दाखल केला. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत होम ट्रँगल ॲपवर त्यांच्या संशय गेला. पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलनंतर शोधलं. त्यावर फोन केल्यावर ते मोबाईल सारखा बंद करत असल्याचे समोर आला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यांचा लोकेशनचा पत्ता लावला. त्यानंतर नालासोपारा, वसई, पालघर आणि बोईसर परिसरात लोकेशननुसार आरोपींचा शोध सुरु झाला. पोलिसांच्या मोहिमेला यश आलं. सत्यम राजेश शुक्ला (वय 26), अनिश ब्रिजभूषण चौरसिया (वय 18) आणि पवन ओमप्रकाश धीवर उर्फ राहुल गौड (वय 26) या तिघांना पोलिसांनी गजाआड केलं. विशेष म्हणजे पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल चोरांकडून जप्त करून तो त्या महिलेला हस्तगत करण्यात आला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES