SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर...’, 'रूम नंबर सांगू का?', '9 तारखेला सकाळी...' सतेज पाटील सगळंच बोलले; 'अमूल'चाही उल्लेख

सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांबद्दल भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सतेज पाटील या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 05, 2026, 02:50 PM IST | Updated: Nov 05, 2026, 03:01 PM IST
Image Credit: पत्रकारांसमोर मांडली आपली भूमिका (प्रातिनिधिक फोटो)
Join

"गोकुळ केंद्रबिंदू म्हणून कायदा सरकारकडून काढण्यात आला. सहकारी ज्यावेळी होते त्यावेळी फक्त फेडरल इन्स्टिट्यूट गोकुळ आणि दोन संस्थांना लागू होणार आहे. यांना गोकुळमध्ये सत्ता मिळवायची आहे. जनतेने दिलेला कौल नाकारायचे काम सरकार करत आहे," असं काँग्रसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी बुधवारी सरकारने 4 अतिरिक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

जबरदस्ती कायदा बदलणे चुकीचं

"कालचा दिवस हा इतिहासातला काळ दिवस मानला जाणार आहे. बहुमत स्वतःकडे वाळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 5.5 लाख शेतकऱ्यांचा संसार यावर आहे. दररोज 20 लाख लिटर दूध गोळा होते. शेतकऱ्यांचे कौल सरकारला मान्य नाही. राहुल गांधींनी आमच्या बाजूने ट्विट केलं. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि कायदा बदलण्याचा निर्णय घेतला. कॅबिनेटमध्ये एकही शब्द बोलले नाहीत. कायदा का आणतोय याचे काय परिणाम होणार आहेत? निवडणुकीच्या आधी हा कायदा झाला असता तर समजू शकतो. आता निवडणूक झाली, मतदान झाले, निकाल लागल्यानंतर कायदा आणला. निकाल तुमच्या बाजूने निकाल लागा नाही म्हणून कायदा बदलायचा. सत्ता मिळवायची आहे म्हणून जबरदस्ती कायदा बदलणे चुकीचं आहे," असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांचा रूम नंबर सांगू का?

हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात बोलताना, "दोस्त ने दोस्तीत गद्दारी केली आहे," असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे. "ज्यांना जनतेने नाकारला ते तज्ज्ञ कसे होऊ शकतात? हे आम्हाला माहिती नाही. 12 जाण गोव्याला गेल्यानंतर सुरत आणि आता उदयपूरमध्ये आहेत. त्यांचा रूम नंबर सांगू का? आता कुठे आहेत ते आम्हाला माहित आहे," असं सतेज पाटलांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलं.

तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही

आम्ही कोर्टात जाणार आहोत. हायकोर्टात सात दिवसांची नोटीस काढावी लागेल. आमची कायदेशीर लढाई सुरू राहणार आहे. सगळे उदयपूरला आहेत आम्हाला 13 चे बहुमत मिळेल. सत्तेत येईसाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. बहुमत मिळालं आहे. कोर्टात निर्णय होईल आम्हाला विश्वास आहे. जनतेने नाकारले आणि कोर्टात निर्णय येणार नाही हे समजले म्हणून त्यांनी कायदा बदलायचा प्रकार केला.  तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही, तुम्हाला सत्तेत बसायचे हा तुमचा एकमेव मुद्दा आहे. फक्त गोकुळसाठी हा कायदा का लागू होत आहे," असं सतेज पाटील म्हणाले.

'अमूल'चा उल्लेख

"वोट चोरीवर आवाज उचलला. आता सत्ता चोरी यांच्याकडून सुरू झाली आहे. मी येताना गोकुळचे दही, गुलाबजाम आणणार होतो. कारण कदाचित उद्यापासून सगळीकडे 'अमूल'चे स्टिकर लागतील की काय असा प्रश्न आहे," असं सूचक विधान सतेज पाटलांनी केलं.  

अदृशशक्तीने त्यांनी काय काय केले ते तुम्ही...

"कायद्यावर विश्वास आहे तर गव्हर्नरची सही घेऊन शासन आदेश काढायला पाहिजे होता. उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळे घेऊन जाणार आहे. माझ्याकडून कोणताही प्रकार घडणार नाही. अदृशशक्तीने त्यांनी काय काय केले ते तुम्ही बघितलं असेल. लोकांनी रस्त्यावर उतरावे लागेल कारण हे प्रकार कोणासोबत ही होऊ शकतो. आमची सत्ता आली नाही म्हणून कायदा बदलू. सुरुवात गोकुळपासून आहे, ती एसआरएपर्यंत जाणार. कोल्हापूरकरांचा अपमान सरकारने केला आहे. मतदानातून संदेश दिला आहे तरी ते अपमान करत आहेत," असं सतेज पाटील म्हणाले.

वोट चोरीसारखं आता सरकार चोरी

"कोल्हापूर सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या विरोधात असे कायदा काढतात. आम्ही रणनीती तयार केली आहे. परंतु आता सांगणार नाही. लोकांचे फोन येत आहेत. ते म्हणतात वोट चोरीसारखं आता सरकार चोरी झाली आहे. तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. कायदा जेव्हा वगळता तेव्हा अॅड करायची प्रक्रिया पण असणार नाही. कोल्हापूरकरांचा विरोधात सरकारने डाव चालवला आहे. कोल्हापूरकरांचा अपमान सरकारने केला आहे. 90 टक्के सरकारच्या नेत्यांशी संपर्क केले आहेत," असं सतेज पाटील म्हणाले.  

हा अपमान फक्त बंटी पाटीलचा नाही तर...

"9 तारखेला (9 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता दसरा चौक येथून कोल्हापूर संघर्ष मोर्चा जिल्हाकार्यालयपर्यंत काढणार आहोत. हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर कोल्हापूरकरांचा अपमान आहे. मोठ्या संख्येने या मोर्च्यात कोल्हापूरकर सहभागी होतील," असंही सतेज पाटील म्हणाले. 

उद्धव ठाकरेंचा फोन

सतेज पाटलांची ही पत्रकार परिषद झाल्यावर त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला. गोकुळबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तुमच्यासोबत असल्याचं आश्वासन ठाकरेंनी सतेज पाटलांना दिलं. या लढ्यात शिवसेना सतेज पाटील यांच्यासोबत असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES