SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शिवाजी पार्क, बुलेट ट्रेन प्रकल्प अन्...; मुंबईतील प्रदूषणाची 'ही' आहेत उगमस्थानं, 129 हॉटस्पॉटची यादी जाहीर

मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये प्रदूषित हवेची समस्या गंभीर होत आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून 2024 मध्ये 28 मुद्द्यांची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 29, 2026, 12:47 PM IST | Updated: Oct 29, 2026, 01:48 PM IST
Image Credit: Mumbai air pollution hotspots
Join

मुंबईतील प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरला आहे. पावसाळा संपताच मुंबईसह महानगरातील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्याचा परिणाम लाहन मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने शहरातील वायुप्रदूषण करणाऱ्या हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रित केले आहे.

मुंबई महापालिकेकडून शहरात प्रदूषण करणाऱ्या हॉटस्पॉटवर आता नजर ठेवणार आहे. त्यासाठी प्रभागनिहाय वायुप्रदूषण हॉटस्पॉट जागांची निवड करण्यात आली असून त्यात धारावी पुनर्विकास प्रकल्प, शिवाजी पार्क मैदान, मेट्रोची कामे, बुलेट ट्रेन प्रकल्प यांचा समावेश आहे. पालिकेने आत्तापर्यंत 17 प्रभागांतील 129 हॉटस्पॉटची निवड केली असून एम पूर्व आणि जी दक्षिण प्रभागामध्ये अनुक्रमे 25 आणि 18 असे सर्वाधिक वायुप्रदूषण हॉटस्पॉट आहेत.

सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या या हॉटस्पॉटवरील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी लवकरच पालिका कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे. पालिकेकडून तशा हालचाली करण्यात येत आहेत. तसंच,  मुंबईतील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने नुकताच 'वायुप्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-2026' तयार केला आहे.  त्यानुसार प्रत्येक महापालिका वॉर्डमध्ये किमान 10 वायुप्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करण्याचा निर्णय घेतानाच बांधकामस्थळे, वाहनांच्या प्रदूषणाचा यात समावेश करण्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले आहेत.

कोणते आहेत हॉटस्पॉट?

धारावी, मेट्रोची कामे, बुलेट ट्रेन, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर), एल्फिन्स्टन पूल,

‘एम’ पूर्व वॉर्डमध्ये घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील विकासकामे

‘टी’ वॉर्डमध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंडमधील 90 फूट रोड आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक व विकासकामांचा समावेश आहे.

‘आर’ उत्तर वॉर्डमध्ये पश्चिम रेल्वेवरील पाचवी-सहावी मार्गिका, दहिसर गावठाण आणि महापालिकेचा दहिसर ट्रान्सपोर्ट हब प्रकल्प यांचा समावेश

‘जी’ उत्तर वॉर्डमधील माहीम-माटुंगा परिसरातील धारावी आणि शिवाजी पार्क मैदानाचा हॉटस्पॉटमध्ये समावेश

‘जी’ दक्षिण वॉर्डमध्ये वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मेट्रो-३ ची कामे, नेहरू सायन्स सेंटर पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांचा समावेश

‘एफ’ दक्षिण वॉर्डमध्ये एल्फिन्स्टन पूल प्रकल्प आणि शिवडीतील झकेरिया बंदर रोडवरील राडारोडा साठवणुकीची ठिकाणे

एच पूर्व वॉर्डमध्ये बीकेसी परिसरातील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटजवळील भाग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांचा समावेश

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES