SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, 1972 ची परिस्थिती पुन्हा उद्भवणार? कृषी विभागाची टेन्शन वाढवणारी आकडेवारी

महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहे. कृषी विभागाची आकडेवारी फारच भयावह आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 21, 2026, 10:18 IST | Updated: Nov 21, 2026, 10:25 IST
Image Credit: महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, 1972 ची परिस्थिती पुन्हा उद्भवणार, कृषी विभागाची टेन्शन वाढवणारी आकडेवारी
Join

महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे. ऐन हिवाळ्यातच अनेक जिल्ह्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर अनेक नद्या कोरडाठाक पडल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतीलाही मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील पेरणीच्या आकडेवारीची तुलना करता 1972 च्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण ठरला आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकूण 310 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी राज्य सरकारने आधीच्या 304 दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 6 तालुक्यांचा समावेश केला आहे. प्रशांत महासागरात सक्रीय असलेला एल निनो हा सुपर म्हणजेच शक्तीशाली एल निनो असल्याचे जाहीर केले आहे. मोसमी पावसावर एल निनोचा थेट परिणाम झाल्यामुळे राज्यात सरासरीच्या तुलनेत 19 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

पाऊसच कमी झाल्याने राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. पाणीच नसल्याने पेरण्यादेखील कमी झाल्या आहेत. 1972-73च्या हंगामात 47.29 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा आजअखेर 14 लाख 74 हजार 304 हेक्टरवर पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या होतात, त्यामुळे यंदा जेमतेम 20 ते 25 लाख हेक्टरपर्यंत पेरणीचा अंदाज आहे. राज्याच्या रब्बी हंगामाच्या इतिहासातील ही सर्वात कमी पेरणी ठरण्याची भीती आहे.

कृषी विभागाकडे 1960 पासूनची रब्बी हंगामातील पेरणीची आकडेवारी आहे. पेरणी क्षेत्राची तुलना करता, यंदाचा दुष्काळ आजवरचा सर्वात भीषण ठरला आहे. राज्यातील रब्बी हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र 55 ते 60 लाख हेक्टर आहे. 1972-73च्या हंगामात एकूण 47.29 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यात अन्नधान्य पिके 36.64, कडधान्य पिके 4.31 आणि तेलबियांची 6.34 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.

यंदा आजवर 14 लाख 74 हजार 304 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात अन्नधान्य पिके 7 लाख 79 हजार 812 हेक्टर, कडधान्यांची 6 लाख 78 हजार 385 हेक्टर आणि तेलबियांची 16 हजार 106 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा डिसेंबरअखेर पेरण्या होतील. पण, एकूण रब्बी पेरा 20 ते 25 लाख हेक्टरच्या वर जाण्याची कोणतीही शक्यता नाही. राज्याच्या इतिहासात आजवरच्या कमी पेर्‍याची नोंद 1991-92 च्या हंगामात झाली होती, त्या वर्षी 40 लाख हेक्टरवर पेरा झाला होता.

कार्तिकी एकादशीवर दुष्काळाचे सावट

आज पंढरपूरमध्ये कार्तिक एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. कार्तिकी एकादशीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल झाले.  दुष्काळाचे सावट या वारीवर असल्यामुळे भाविकांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते. आज पहाटेपासूनच चंद्रभागेमध्ये स्नानासाठी भाविकांनी गर्दी केलेल्या चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून हे भाविक विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुखदर्शन रांगेमध्ये जात असतात संपूर्ण वाळवंट हे भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रात दिसते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES