SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹10 कोटी दंड, 10 वर्ष जेल, मालमत्ता जप्ती अन्... महाराष्ट्रात 'हा' गुन्हा खरोखरच महागात पडणार? 5 पॉइंट्समध्ये समजून घ्या

महाराष्ट्रातील तरुण पिढीला या नव्या नियमांचा सर्वाधिक फायदा होणार असून मागील बऱ्याच काळापासून चर्चा आणि वादात असलेला प्रश्न निकाली निघणार आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 12:11 IST | Updated: Nov 24, 2026, 12:18 IST
Image Credit: तरुणांना या नव्या नियमांचा होणार सर्वाधिक फायदा (प्रातिनिधिक फोटो)
Join

भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने दुसरा अहवाल सादर केला आहे. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस या समितीने केली आहे. संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना 7 ते 10 वर्षांच्या कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. इतकेच नाही तर किमान 10 कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. अनेक नवीन शिफारशी सुचवण्यात आल्या असून या लागू झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा तरुणांना होणार आहे.

त्यांना 5 कोटी दंड, 8 वर्ष बंदी

राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी 4 सप्टेंबर 2026 रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने आपला दुसरा अहवाल 23 नोव्हेंबर 2026 रोजी शासनाला सादर केला आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे कारावास आणि 50 लाखांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली असून गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना 5 कोटींपर्यंत दंड आणि 8 वर्षांसाठी बंदी घालावी असं सुचवण्यात आलं आहे. परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस या समितीने केली आहे. गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. 

विशेष न्यायालय

परीक्षा गैरप्रकारांचे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची शिफारस करतानाच या शिफारशी लागू झाल्यास एमपीएससी परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली असून दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना केली गेली आहे.

रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी...

उमेदवारांसाठी 'आधार' किंवा 'महाआयडी'द्वारे  (MahaID) एकदाच नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे.  परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय बदल सुचवण्यात आले असून रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी इंटीग्रेटेड रिक्वेझिशन पोर्टल (Integrated Requisition Portal) विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात...

सप्टेंबरअखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे, असंही सुवचण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना या समितीने केली आहे. परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (व्हेन्यू बँक) तयार करण्याची शिफारस केली गेली आहे. 

सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान

परीक्षा केंद्रांच्या निवडी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना करण्यात आली असून परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस या अहवालामध्ये आहे. हे निर्णय घेण्यात आल्यास राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES