SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

30 कोटींचा प्रकल्प, 40 मीटर उंच कारंजे, लेझर शो अन् बरंच काही...; मुंबईकरांना मिळणार नवं पर्यटनस्थळ, कुठं आहे हे ठिकाण?

पवई तलावावर आजापासून नयनरम्य रोषणाई, ३० कोटींचा प्रकल्प सज्ज, 40 मीटर उंच कारंजे, लेझर शोसह संगीताचा मिलाफ

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 22, 2026, 10:56 IST | Updated: Nov 22, 2026, 10:58 IST
Image Credit: Powai Lake is set to get a Rs 30 crore musical fountain multimedia show at Ganesh Ghat
Join

मुंबईकरांना आता आणखी एक पर्यटनस्थळ मिळणार आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. सुमारे 30 कोटी रुपये खर्चुन म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अत्याधुनिक 180 मीटर लांबीचा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. आज मंत्री मंगालप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अत्याधुनिक म्युझिकल फाऊंटन आणि लाईट अँड साऊंड शोचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अतिभव्य आणि अद्भुत स्वरूपात सादर केली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसंच, 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन देशातील सर्वांत मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार आहे. येथे पर्यटकांसाठी दररोज तीन शो आयोजित करण्याचे नियोजन आहे.

पवई तलाव गणेश घाट येथे लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शोचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फाउंटनमध्ये अत्याधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 40 मीटर उंचीपर्यंत झेपावणारे वॉटर जेट्स आणि 27 फायर जेट्स हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहेत.

त्याचबरोबर, रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्स यामुळं पाण्याच्या विविध रचना साकारल्या जातील. संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा आणि वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन व लेझर प्रतिमा यांचा संगम हे नागरिकांसाठी आकर्षण ठरू शकतं.

कारंज्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 30 लाख लीटर पाण्यात हवा मिसळली जाणार असल्याने (एरेशन प्रक्रिया) तलावातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. तसंच, जलचरांना हानी पोहोचू नये याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसंच, आवाजाची तीव्रता डेसिबल मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येतेय.

तिकीट दर आणि बुकिंग. म्हाडा किंवा प्रशासनाकडून या शोसाठी अद्याप कोणतेही प्रवेश शुल्क (तिकीट दर) जाहीर करण्यात आलेले नाहीत. उद्घाटनानंतर हे शो सर्वसामान्य पर्यटकांसाठी मोफत असतील की नाममात्र शुल्क आकारले जाईल, याबाबत अधिकृत घोषणा होईल.  गणेश घाटावर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खुर्च्या, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, सीसीटीव्ही सुरक्षा आणि प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES