SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुम्ही दिलेली जेवणाची ऑर्डर कशी शिजतेय, हे लाइव्ह पाहता येणार, BMC मोठ्या निर्णयाच्या तयारीत

हॉटेल, रेस्टॉरंटच्या किचनमध्ये तुमची डिश कशी शिजतेय- ग्राहकांना लाईव्ह पहाता येणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 19, 2026, 11:59 IST | Updated: Nov 19, 2026, 12:03 IST
Image Credit: proposal to require live kitchen screens in Mumbai hotels restaurants improve hygiene transparency
Join

अन्न व औषध प्रशासन एफडीएने महाराष्ट्रात धडक मोहिम सुरू केली आहे. हॉटेल, रेस्तराँमधील अस्वच्छता असो किंवा अन्नभेसळ याविरोधात मोठी पावलं उचलली आहेत. एफडीएने अनेक बड्या हॉटेलवर कारवाई करत परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळं ग्राहकही आता बाहेरचं अन्न खाताना धास्तावले आहेत. मात्र आता मुंबई महानगरपालिका लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता हॉटेल, रेस्तराँमध्ये गेल्यानंतर किचनमध्ये तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ कसा शिजतोय, हे तुम्हाला लाइव्ह पाहता येणार आहे.

मुंबईतील रहिवाशांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिका मोठा निर्णय घेऊ शकते. मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये लाईव्ह किचन स्क्रीनींग बंधनकारक करा, अशा सूचना बीएमसी ठरावात दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांची ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी केली होती. तसंच, एफएसएसएआयच्या अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.

मुंबईतील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी स्क्रीन बसवून स्वयंपाकघरातील कामकाज थेट दाखवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, हॉटेल किंवा रेस्तराँमधील स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नपदार्थांची हाताळणी आणि कर्मचाऱ्यांकडून पाळल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या नियमांवर लक्ष राहण्यास मदत होईल. तसंच, अन्नपदार्थांची साठवणूक, भांडी आणि उपकरणांची स्वच्छता तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन याबाबत ग्राहकांना पारदर्शक माहिती मिळेल, हा यामागचा उद्देश होता.

अनेक खाद्य आस्थापनांच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य हाताळणी आणि साठवणुकीबाबत तक्रारी होत असल्याचा दावा करण्यात येत होता. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवण्याची मागणी सातत्याने होत आहे.

राज्यभरात सौंदर्यप्रसाधने जप्त

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भ्रामक दावे करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करून तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांविरोधात मोहीम उघडली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथील तीन स्वतंत्र कारवायांत 34  लाख 61 हजार 357 रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे घटक यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES