SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दीड वर्षात तब्बल 72 खुनाच्या घटना, पुण्यात कसा उडाला गँगवॉरचा भडका?

2024 साली पुण्यात 94 तर 2025 साली 84 खून झालेत. 2026 च्या चालूवर्षी तर अवघ्या 10 महिन्यात हाच खुनाचा आकडा 72 वर जाऊन पोहोचलाय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 25, 2026, 20:44 IST | Updated: Nov 25, 2026, 20:58 IST
Image Credit: पुणे गँगवॉर
Join

चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे: पुणे शहर आज पुन्हा कोर्टाबाहेरच्या गँगवॉरने हादरलं.पण हे हत्यासञ काय आजच सुरू झालेलं नाहीये. गेल्या जानेवारीपासून पुण्यात तब्बल 72 खुनाच्या घटना घडल्यात. पुण्यातील गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्या.

पुण्यात गँगवॉरचा पुन्हा भडका

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीवर पुणे कोर्टाबाहेरच फायरिंगसह कोयत्याने फिल्मिस्टाईल वार करण्यात आले. गेल्या 10 महीन्यात पुण्यात 72 खुनाच्या घटना घडल्या. गेल्या तीन वर्षातील पुण्यातील खुनांच्या घटनांचा चार्टच पुणे गँगवॉरचं  रक्तरंजित सत्य सांगून जातो. अगदी आकडेवारीतच बोलायचं झालं तर 2024 साली पुण्यात 94 तर 2025 साली 84 खून झालेत. 2026 च्या चालूवर्षी तर अवघ्या 10 महिन्यात हाच खुनाचा आकडा 72 वर जाऊन पोहोचलाय.

माळवदकर - आंदेकर टोळी

पुण्याच्या गँगवॉर रक्तरंजित इतिहास हा तसा 1984 साली पुणे कोर्टात माळवदकर - आंदेकर टोळीत घडलेल्या बदला खून सञातून सुरू झाला.नंतरच्या काळात माळवदकर गँगला संपवून बंडू आंदेकर नाना पेठेतील गँगचा म्होरख्या बनला तो आजतागायत कायम हे.आता तर तो तिकडे धुळे जेलमध्ये बसून इकडे पुण्यात गँगवॉर घडवतोय. नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनापासूनच आंदेकर फँमिलीत हा 'बदला सूडसञा'चा सिलसिला सुरू झालाय. त्यातूनच गेल्या वर्षभरात बंडू आंदेकर टोळीने स्वत: चा नातू आयुष कोमकर सह रिक्षाचालक गणेश काळे या दोघांचा भर दिवसा मर्डर केला तर आणखी एका आरोपीवर प्राणघातक हल्ला घडवून आणलाय. हे झालं आंदेकर विरूद्ध सोमनाथ गायकवाड टोळीयुद्धाचे अपडेट्स. 19 फेब्रुवारी 2025 रोजी कोथरूडमधे गजा मारणे टोळीच्या गुडांनी एका आयटी अभियंत्याला मारहाण करताच पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला होता.

क्राइम ब्रांच बघ्याच्या भूमिकेत?

17 सप्टेंबर 2025 रोजी निलेश घायवळ टोळीने एका तरुणावर गोळीबार करताच पोलिसांनी निलेश घायवळ टोळीवर मोक्का लावला होता पण निलेश घायवळ त्याआधीच लंडन फरार झालता तेव्हापासून तो तिकडेच आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळला  माञ पुणे पोलिसांनी राजस्थानातून जेरबंद केलंय. या झाल्या गेल्या वर्षभरातील प्रमुख टोळ्यांचे अपडेट्स पण अलिकडे आंबेगाव, येरवडा भागातही अनेक लहाण मोठ्या टोळ्या अल्पवनीय मुलांच्या हाती कोयता देऊन रस्त्यावर सातत्याने हल्ले घडवून पुणे पोलिसांना आव्हान देत आलीत.पण पुणे पोलीसांची क्राइम ब्रांच बघ्याची भूमिका घेण्यातच धन्यता मानतेय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES