• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

मुंबईतील माहिममध्ये गोळीबार झाला आहे. पी.सी.जैन ज्वेलर्सवर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 20:53 IST|Updated: Nov 25, 2026, 21:30 IST
joinshare
मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या
Image Credit: मुंबईच्या माहीममध्ये गोळीबार!

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

2

कोर्टाने धनुबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्याचे आदेश दिले, पण त्यांनी चिन्ह स्विकारले नाही तर काय होईल? असीम सरोदे यांना मांडला अत्यंत महत्वाचा मुद्दा

3

दीड वर्षात तब्बल 72 खुनाच्या घटना, पुण्यात कसा उडाला गँगवॉरचा भडका?

4

तरुणीला उचलून हॉटेलात नेणाऱ्या सलमानचा हाफ एन्काऊंटर! पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चौकशीत धक्कादायक खुलासे

5

'बचके तू रहना रे..', पुणे कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदारला दिला होता इशारा; बब्याचं इंस्टा रिल चर्चेत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील माहिममध्ये गोळीबार झाला आहे. शोभा हॉटेलच्या शेजारी असलेल्या पी.सी.जैन ज्वेलर्सवर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार करणारे दुचाकीवरुन आले होते. संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर माहीम पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान हा गोळीबार कोणी केली आणि यामागील  कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हेल्मेट घातलेले दोन अज्ञात इसम दुचाकीवरून घटनास्थळी आले. त्यांनी दुकानाजवळ दुचाकी थांबवून खाली उतरत थेट दुकानाबाहेरील फुटपाथवरून दोन राऊंड फायर केले. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेत आहेत.

माहीम हा वर्दळीचा पसिसर असून येथे नेहमीच लोकांची गर्दी असते. या परिसरात काही प्रसिद्ध हॉटेल्स असल्याने संध्याकाळी खवय्यांची गर्दी असते. तसंच वांद्रेहून दादर, परळच्या दिशेने जाताना याच रस्त्याचा वापर केला जात असल्याने येथे वाहनंही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार होणं सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारं आहे. 

समाधान सरवणकरांची पोलिसांवर टीका

"याआधाही माहिममधून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. माहिममध्ये दर्ग्याच्या मागे अनेक ड्रग्ज पेडलर्स असतात. तिते सुळसुळाट सुरु असून पोलिसांचं अजिबात लक्ष नाही. नागरिक वारंवार तक्रार असताना कोणतीही कारवाई होत नाही," असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केला आहे. 

'गृहमंत्र्यांचं मुंबई, पुणे, महाराष्ट्राकडे लक्ष आहे का?'

गृहमंत्र्यांचं मुंबई, पुणे, महाराष्ट्राकडे लक्ष आहे का? की फक्त सत्ता कशी टिकवता येईल याकडे लक्ष आहे? ते काय करत आहेत? सतत पोलिसांनाच दोष द्यायचा का? त्यांच्यावर त्यांच्या कामाचा ताण आहे की इतर काही ताण दिला आहे? अशी विचारणा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी विचारली आहे. 

पुण्याला शिवाजीनगरमध्ये आज खून झाला. नाशिक, मुंबईत ड्रग्जचं ट्रॅफिकिंग आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? आता तरी गृहमंत्र्यांनी जातीनं लक्ष दिलं पाहिजे. लोकांना शांततेत राहता आलं पाहिजे. कायद्याचा धाक निर्माण केला पाहिजे. माहिममसारख्या गजबजलेल्या ठिकाणी 7.30 वाजता गोळीबार होतो आणि आपण नुसत्या बातम्या पाहायच्या? आता हे बोलूनही कंटाळा आला आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
crime