Asim Sarode On Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष-चिन्हासंदर्भात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना पक्ष-चिन्ह उद्धव ठाकरेंना दिलं जाईल. पण, उद्धव ठाकरे यांनी हे चिन्ह स्विकारले नाही तर पुढे काय होईल याबाबत वकिल असीम सरोदे यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे.. दरम्यान हीच लढाई आता अंतिम टप्प्यात आल्यानं सुप्रीम कोर्ट नेमका कोणता निकाल देणार. धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाणार की एकनाथ शिंदेंच बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पक्ष चिन्हाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र, सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला चिन्ह गोठवण्याचे निर्देश देऊ शकतात. चिन्ह गोठवा किंवा ते ठाकरेंच्या ओरीजन शिवसनेला द्या. असा निर्णय होऊ शकतो. असा निर्णय झाल्यास चिन्ह स्विकाराचे की नाही याबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्यांनी जर म्हंटले आमची मशाल आम्हाला पाहिजे. चिन्ह गोठवून टाका असं उद्धव ठाकरे म्हणाले तर चिन्ह गोठवले जाईल. धनुष्यबाण चिन्ह कोणालाच मिळणार नाही. ज्या चिन्हाबद्दलचा वाद आहे ते चिन्ह निवडणूक आयोगाने आधीच गोठवले पाहिजे होतो. निवडणूक आयोगाने मोठी बदमाशी केली. त्यांनी चिन्ह गोठवले नाही. यामुळे चिन्हाचा वद निर्माण झाला असा दावा असीम सरोदे यांनी केला.
दरम्यान आज पार पडलेल्या सुनावणीत 26 जून रोजी विधानसभाध्यक्षांनी केलेल्या ठरावावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसंच शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय कसा चुकीचा होता हे निदर्शनास आणून दिलं, शिंदेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर कपिल सिब्बल यांनी जोरदार पलटवार केला आहे. रावावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय कसा चुकीचा होता हे निदर्शनास आणून दिलं, शिंदेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर कपिल सिब्बल यांनी जोरदार पलटवार केला.