SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Holiday List: 2027 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 4 महिने सुट्ट्या, मार्चमध्ये तर सलग 9 दिवसांचा ब्रेक!

मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना 2027 मध्ये 121 दिवस सुट्ट्या मिळण्याचा प्रस्ताव आहे. मार्चमध्ये सलग 9 दिवस आणि एप्रिलमध्ये 5 ते 6 दिवसांचा ब्रेक कसा मिळू शकतो? जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 23, 2026, 21:27 IST | Updated: Nov 23, 2026, 21:39 IST
Image Credit: 2027 वर्षातील सुट्ट्या
Join

मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2027 या वर्षाचे प्रस्तावित सुट्टीचे कॅलेंडर चर्चेत आले आहे. वर्षभरातील शनिवार-रविवार आणि सार्वजनिक व सामान्य सुट्ट्या मिळून कर्मचाऱ्यांना एकूण 121 दिवसांची सुट्टी मिळू शकते. विशेष म्हणजे मार्च महिन्यात रजा योग्य पद्धतीने घेतल्यास सलग नऊ दिवसांचा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

वर्षभरात 121 दिवस सुट्ट्यांचे गणित काय?

प्रस्तावित कॅलेंडरनुसार, मध्य प्रदेशातील सरकारी कार्यालयांमध्ये सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस कामका 52 शनिवार आणि 52 रविवार मिळून 104 साप्ताहिक सुट्ट्या होतात. त्यात 17 सार्वजनिक आणि सामान्य सुट्ट्यांची भर पडल्यास एकूण 121 दिवस सुट्ट्यांचा आकडा गाठला जातो. या गणनेनुसार सरकारी कार्यालये वर्षभरात सुमारे 244दिवस सुरू राहतील.

ऐच्छिक सुट्ट्यांमधून तीन दिवस निवडण्याची संधी

कर्मचाऱ्यांसाठी 62 ऐच्छिक सुट्ट्यांची यादी प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे. या यादीतून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या आवडीनुसार तीन दिवस सुट्ट्या निवडता येऊ शकतात. विविध धर्म आणि समुदायांच्या सणांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरते.

मार्चमध्ये सलग नऊ दिवसांचा ब्रेक?

मार्च 2027 मध्ये 20 आणि 21 मार्चला शनिवार-रविवार,22 मार्चला होळी आणि 26 मार्चला गुड फ्रायडे अशी सुट्टीची शक्यता आहे. 24 मार्चला भाईदूज असल्याचे प्रस्तावित वेळापत्रकात नमूद आहे. कर्मचारी 23 आणि 25 मार्चला रजा घेऊ शकले, तर 20 ते 28 मार्चदरम्यान सलग नऊ दिवसांचा ब्रेक मिळू शकतो.

एप्रिलमध्येही दोन मोठ्या सुट्टीच्या संधी

एप्रिलमध्ये गुडीपाडवा आणि चेटीचंदच्या आसपास 7 ते 11 एप्रिलदरम्यान पाच दिवसांचा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. तसेच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिलला रामनवमी आणि 19 एप्रिलला महावीर जयंती अशा तारखांचा समावेश प्रस्तावित यादीत आहे. 16 एप्रिलला रजा घेतल्यास 14 ते 19 एप्रिलदरम्यान सहा दिवसांचा ब्रेक तयार होऊ शकतो.

दिवाळीत पाच दिवस सणांचा उत्सव

ऑक्टोबर महिन्यात 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान धनत्रयोदशी, छोटी दिवाळी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज असे सण सलग येत असल्याचे प्रस्तावित कॅलेंडरमध्ये नमूद आहे. मध्य प्रदेश सरकारची 2027 ची अंतिम सुट्टी यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच या सर्व तारखा आणि सुट्ट्यांची संख्या निश्चित होतील, याची नोंद घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES