SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'शरद पवार, सुप्रिया सुळे उघडपणे भाजपला मदत करतात', मग भाजपची बी-टीम…; अंजली आंबेडकरांची पोस्ट

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अंजली प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 24, 2026, 11:29 IST | Updated: Nov 24, 2026, 11:33 IST
Image Credit: Anjali Ambedkar on Supriya Sule Sharad Pawar
Join

शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात मात्र त्यांना भाजपची बी-टीम म्हटलं जात नाही अशी टीका प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकरांनी केलीय. शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात तेव्हा अचानक आवाज बंद होतात असा आरोपही त्यांनी केलाय. वंचितला भाजपची बी-टीम ठरवणाऱ्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले? असा सवाल त्यांनी केलाय.

अंजली आंबेडकर यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय?

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या अलीकडील निर्णयावर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले? निर्भय बनोच्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले? वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोचे लोक नेहमीच तत्पर असतात. 

मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात. तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात. 2024 च्या निवडणुकीत प्रबळ जातींच्या राजकीय पक्षांसाठी या उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी जोरदार प्रचार केला. त्या पक्षांना प्रश्न विचारण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते जाणीवपूर्वक गप्प बसतात.हा बौद्धिक विसंगतीचा प्रश्न नाही, तर राजकीय सोय आणि जातीवर आधारित ‘निवडक संताप’ दाखवणारी कृती आहे. यांच्या राजकीय नैतिकतेत एक विचित्र दुटप्पीपणा दिसून येतो.

Maharashtra Breaking News Today LIVE : शरद पवार NDA मध्ये जाणार नाहीत - राऊत

बहुजनांच्या राजकीय अस्मितेवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर ते सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, ज्या सवर्ण राजकीय पक्षांच्या कृती भाजपचा सामाजिक आणि राजकीय अजेंडा अधिक मजबूत करत आहेत. त्यांच्याबाबत मात्र कमालीची उदार भूमिका घेतात.भाजपने प्रस्तावित केलेले डिलिमिटेशन विधेयकाला हे SIR पेक्षाही अधिक धोकादायक आहे. या डिलिमिटेशन विधेयकामुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व असमान प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या संघराज्यीय समतोलाला मूलभूत धक्का बसू शकतो. एका विशिष्ट प्रादेशिक गटाच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित होऊ शकते आणि संघराज्य व्यवस्थेतील समान प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला बाधा पोहोचू शकते. हा काही केवळ संसदेतील तांत्रिक प्रक्रियेचा विषय नाही. हा भारताच्या लोकशाहीच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES