• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

6 खासदार आमचेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यावर शिदेंच गटाने उत्तर दिले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 29, 2026, 19:11 IST|Updated: Nov 29, 2026, 19:17 IST
joinshare
6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर;  उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

2

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

3

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

4

रोहित शर्मासाठी मुंबईच्या रस्त्यावर 100 किमी धावला जबरा फॅन, दिलेला शब्द केला पूर्ण!

5

'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उद्धव ठाकरे शिवसेना : डिलिमिटेशन विधेयावरुन उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त खेळी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी 9 खासदारांना व्हीप बजावला आहे. 9 खासदारांच्या यादीत शिंदे गटात प्रवेश केलेल्या 6 खासदारंचा देखील समावेश आहे. 6 खासदार आमचेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला. यावर शिंदे गटाचे प्रमुख नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केला आहे.  

6 खासदार शिंदे सोबसत गेले. ते 6 खासदार आमचेच. त्यांना बसाला जागा दिली म्हणजे मान्यता दिलेले नाही.  9 खासदारांना पक्षाधेश दिलेला आहे. मतदान कसं करायचं याच्या सूचना आम्ही केल्या आहेत अस उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदत सांगितले. 

डिलिमिटेशनच्या विधेयकावरुन सध्या देशभरात राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. विशेष म्हणजे, ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena UBT) पक्षाकडून फुटीर 6 खासदारांनाही व्हीप बजावण्यात आला आहे. मात्र, या खासदारांनी आधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, डिलिमिटेशन विधेयकास या सर्वच खासदारांचा पाठिंबा असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेवरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर मंत्री उदय सामंत  यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. 

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटतील अशी भीती सुप्रिया सुळे यांना आहे. म्हणून, त्यांनी डिलिमिटेशन विधेयकास पाठिंबा दिलाय, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. आता, या वक्तव्यावर पलटवार करताना मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलंय. असं बोलता बोलता यांचे पण खासदार फुटणार आहेत, शिल्लक असलेले, असे उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेतील उर्वरीत तीन खासदार देखील या विधेयकाच्या बाजुने मतदान करतील का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. कारण, दोन दिवसांपूर्वीच खासदार अरविंद सावंत यांनीही पक्षाची भूमिका मांडताना, ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा या विधेयकास ना विरोध आहे, ना पाठिंबा असे म्हटले होते. त्यामुळे, उदय सामंत यांचं खासदार फुटीसंदर्भातील वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारं आहेत. 

फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? असीम सरोदे यांचे उत्तर  

मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिच्छेद 2(1)b च्या बॉम्ब चा प्रतिकार कसा करणार?  शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत जाऊन मिळाले. कोणतीही प्रक्रिया न पाळता भाजप चे लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी त्या सहा फुटीर खासदारांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली. 
या सहा खासदारांवर 10 व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) a नुसार स्वतःच्या वागणुकीतून पक्षविरोधी वागणूक केल्याने अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या सहापैकी कुणालाही उद्धव साहेबांनी पक्षातून काढून टाकलेले नाही त्यामुळे ते खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचा भाग आहेत.  त्यामुळेच त्या सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे अशी स्पष्ट सूचना देणार राजकीय पक्ष शिवसेनेचा ल व्हीप त्याना इशू करण्यात आलेला आहे.  आता त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बील च्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Maharashtra Politics
Political News