• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टेस्ट सामन्यातील यशस्वी जयस्वालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजाला बाद करताना त्याचा एका हाताने कॅच घेतला.

Reported Bypooja pawar
Published: Nov 29, 2026, 19:25 IST|Updated: Nov 29, 2026, 20:16 IST
joinshare
सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच
Image Credit: सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

2

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

3

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

4

रोहित शर्मासाठी मुंबईच्या रस्त्यावर 100 किमी धावला जबरा फॅन, दिलेला शब्द केला पूर्ण!

5

'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्चमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने फिल्डिंग करत असताना एक जबरदस्त कॅच घेतला. त्याने हवेत डाइव्ह मारून एका हाताने जबरदस्त कॅच पकडला. या जबरदस्त कॅचमुळे डेवोन कॉनवे बाद झाला. सध्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वॉशिंगटन सुंदरने 33 व्या ओव्हरला टाकलेला पहिला बॉल हा हवेत होता ज्यावर डेवोन कॉनवे जोरदार फटका मारला. मात्र बॉल बॅटला नीट लागला नाही आणि तो हवेत 'शॉर्ट थर्ड मॅन'च्या दिशेने गेला. बॉल त्याच्या डाव्या बाजूला खाली येत असताना, यशस्वी जयस्वालने वेगाने धाव घेत हवेत झेप घेतली. त्याने एक जबरदस्त डायव्ह मारून एका हाताने कॅच पकडला की, भारतीय चाहते पाहतच राहिले.

हेही वाचा : 'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video
 

A screamer from Jaiswal! One hand, full stretch and a moment of pure brilliance to dismiss Conway!  Watch the HERO VIDA India Tour of New Zealand, 2nd Test, Day 3, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV. SonySportsNetwork SonyLIV NZVIND https://t.co/3skRR5sw2d

Sony Sports Network (SonySportsNetwk) November 29, 2026

 क्राइस्टचर्चच्या हेगली ओव्हलमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट गमावून 133 धावा केल्या. न्यूझीलंड सध्या 243 धावांच्या आघाडीसह मजबूत स्थितीत आहे. इथून भारतीय संघासाठी सामना जिंकणे अत्यंत कठीण असेल. भारताने पहिल्या डावात 243 धावा केल्या ज्यामध्ये अव्वल फळीतील फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याआधी न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात 356 धावा केल्या होत्या. या सीरिजमधील पहिली टेस्ट अनिर्णित राहिली होती. जर भारत ही कसोटी जिंकण्यात अपयशी ठरला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेतील त्यांची स्थिती लक्षणीयरीत्या खालावेल, ज्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता अत्यंत आव्हानात्मक होईल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india