6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा
6 खासदार आमचेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यावर शिदेंच गटाने उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना : डिलिमिटेशन विधेयावरुन उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त खेळी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी 9 खासदारांना व्हीप बजावला आहे. 9 खासदारांच्या यादीत शिंदे गटात प्रवेश केलेल्या 6 खासदारंचा देखील समावेश आहे. 6 खासदार आमचेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला. यावर शिंदे गटाचे प्रमुख नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केला आहे.
6 खासदार शिंदे सोबसत गेले. ते 6 खासदार आमचेच. त्यांना बसाला जागा दिली म्हणजे मान्यता दिलेले नाही. 9 खासदारांना पक्षाधेश दिलेला आहे. मतदान कसं करायचं याच्या सूचना आम्ही केल्या आहेत अस उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदत सांगितले.
डिलिमिटेशनच्या विधेयकावरुन सध्या देशभरात राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. विशेष म्हणजे, ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena UBT) पक्षाकडून फुटीर 6 खासदारांनाही व्हीप बजावण्यात आला आहे. मात्र, या खासदारांनी आधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, डिलिमिटेशन विधेयकास या सर्वच खासदारांचा पाठिंबा असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेवरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटतील अशी भीती सुप्रिया सुळे यांना आहे. म्हणून, त्यांनी डिलिमिटेशन विधेयकास पाठिंबा दिलाय, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. आता, या वक्तव्यावर पलटवार करताना मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलंय. असं बोलता बोलता यांचे पण खासदार फुटणार आहेत, शिल्लक असलेले, असे उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेतील उर्वरीत तीन खासदार देखील या विधेयकाच्या बाजुने मतदान करतील का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. कारण, दोन दिवसांपूर्वीच खासदार अरविंद सावंत यांनीही पक्षाची भूमिका मांडताना, ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा या विधेयकास ना विरोध आहे, ना पाठिंबा असे म्हटले होते. त्यामुळे, उदय सामंत यांचं खासदार फुटीसंदर्भातील वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारं आहेत.
फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? असीम सरोदे यांचे उत्तर
मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिच्छेद 2(1)b च्या बॉम्ब चा प्रतिकार कसा करणार? शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत जाऊन मिळाले. कोणतीही प्रक्रिया न पाळता भाजप चे लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी त्या सहा फुटीर खासदारांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली.
या सहा खासदारांवर 10 व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) a नुसार स्वतःच्या वागणुकीतून पक्षविरोधी वागणूक केल्याने अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या सहापैकी कुणालाही उद्धव साहेबांनी पक्षातून काढून टाकलेले नाही त्यामुळे ते खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचा भाग आहेत. त्यामुळेच त्या सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे अशी स्पष्ट सूचना देणार राजकीय पक्ष शिवसेनेचा ल व्हीप त्याना इशू करण्यात आलेला आहे. आता त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बील च्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील.