SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना गोडाऊनमध्ये बसवलं; मुंबई विद्यापीठातील संतापजनक प्रकार

आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना गोडाऊनमध्ये बसवण्यात आले. मुंबई विद्यापीठातील ठाकरेंच्या आमदारांसह अपमानजनक प्रकार घडला.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 16, 2026, 16:09 IST | Updated: Nov 16, 2026, 16:18 IST
Join

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारांसह अपमानजनक प्रकार घडला आहे.  आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना गोडाऊनमध्ये बसवण्यात आले. मुंबई विद्यापीठात हा संतापजनक प्रकार घडला आहे. आमदार कुलगुरू यांना भेटण्यासाठी आलेले होते त्यावेळेस हा प्रकार घडला. 

मुंबई विद्यापीठात ठाकरेंच्या सेनेचे आमदार आक्रमक झाले आहेत. आमदारांना विद्यापीठाच्या गोडाऊनमध्ये बसवण्यात आले. आमदार कुलगुरू यांना भेटण्यासाठी आलेले होते. विद्यापीठाच्या विविध विषयांसंबंधित आमदार कुलगुरू यांना भेटण्यासाठी आले होते. ठाकरे सेनेच्या आमदारांना विद्यापीठात गोडाऊन मध्ये बसवल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व आमदार आक्रमक झाले.

आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई, ज मो अभ्यंकर, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील शिंदे, महेश सावंत, बाळा नर आदी आमदार उपस्थित होते.   विद्यापीठाशी संबंधित विषयांसाठी आमदार विद्यापीठात कुलगुरूंना भेटण्यासाठी आले होते.  मात्र या सर्वांना गोडाऊन मध्ये बसवण्यात आलं.  

आदित्य ठाकरे  संतापले

मुंबईतील सगळे आमदार आम्ही कुलगुरूंची भेट घेण्यासाठी आलो होतो.  काही आमदार आधी पोहोचले त्यांना चांगली वागणूक दिली नाही.  महाराष्ट्राच्या आमदारांचा अपमान झाला असा संताप आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.  

प्रदीप सावंत आहे जे सीनेटचे सदस्य आहेत. कॉलेज मध्ये ते विद्यार्थ्यांचे विषय मांडतात . मध्यंतरी काही कॉलेजचे विषय त्यांनी घेतले. अनेक ठिकाणी घाणीचे सम्राज्य पसरले आहे.  हे प्रश्न उपस्थित केल्यामुळे प्रदीप सावंत यांना शोकोस नोटीस पाठवण्यात आली. हे गंभीर आहे.  पहिल्यांदा असं झाले आहे की जे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे डिस्कॉलिफाय का करू आय असं म्हणत आहे. सावंत यांना पाठवलेली नोटीस मागे घ्या अन्यथा आम्ही तुमच्या घराबाहेर येऊन आंदोलन करू - असं आम्ही आज विद्यापीठाला सांगितलं आहे. आम्ही आता फक्त सभ्य भाषेत चर्चा करायला आलो आहे. जर शाळेत कॉलेज मध्ये अशी परिस्थिती असेल तर सिनेट सदस्यांनी प्रश्न उपस्थित करू नये का? विद्यार्थी संघटनाना माझी विनंती आहे की प्रत्येक शाळेत आणि कॉलेज मध्ये जाऊन त्याचे फोटो काढून शोषल मीडियावर टाका असं अदित्य ठाकरे म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES