शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारांसह अपमानजनक प्रकार घडला आहे. आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना गोडाऊनमध्ये बसवण्यात आले. मुंबई विद्यापीठात हा संतापजनक प्रकार घडला आहे. आमदार कुलगुरू यांना भेटण्यासाठी आलेले होते त्यावेळेस हा प्रकार घडला.
मुंबई विद्यापीठात ठाकरेंच्या सेनेचे आमदार आक्रमक झाले आहेत. आमदारांना विद्यापीठाच्या गोडाऊनमध्ये बसवण्यात आले. आमदार कुलगुरू यांना भेटण्यासाठी आलेले होते. विद्यापीठाच्या विविध विषयांसंबंधित आमदार कुलगुरू यांना भेटण्यासाठी आले होते. ठाकरे सेनेच्या आमदारांना विद्यापीठात गोडाऊन मध्ये बसवल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व आमदार आक्रमक झाले.
आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई, ज मो अभ्यंकर, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील शिंदे, महेश सावंत, बाळा नर आदी आमदार उपस्थित होते. विद्यापीठाशी संबंधित विषयांसाठी आमदार विद्यापीठात कुलगुरूंना भेटण्यासाठी आले होते. मात्र या सर्वांना गोडाऊन मध्ये बसवण्यात आलं.
मुंबईतील सगळे आमदार आम्ही कुलगुरूंची भेट घेण्यासाठी आलो होतो. काही आमदार आधी पोहोचले त्यांना चांगली वागणूक दिली नाही. महाराष्ट्राच्या आमदारांचा अपमान झाला असा संताप आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
प्रदीप सावंत आहे जे सीनेटचे सदस्य आहेत. कॉलेज मध्ये ते विद्यार्थ्यांचे विषय मांडतात . मध्यंतरी काही कॉलेजचे विषय त्यांनी घेतले. अनेक ठिकाणी घाणीचे सम्राज्य पसरले आहे. हे प्रश्न उपस्थित केल्यामुळे प्रदीप सावंत यांना शोकोस नोटीस पाठवण्यात आली. हे गंभीर आहे. पहिल्यांदा असं झाले आहे की जे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे डिस्कॉलिफाय का करू आय असं म्हणत आहे. सावंत यांना पाठवलेली नोटीस मागे घ्या अन्यथा आम्ही तुमच्या घराबाहेर येऊन आंदोलन करू - असं आम्ही आज विद्यापीठाला सांगितलं आहे. आम्ही आता फक्त सभ्य भाषेत चर्चा करायला आलो आहे. जर शाळेत कॉलेज मध्ये अशी परिस्थिती असेल तर सिनेट सदस्यांनी प्रश्न उपस्थित करू नये का? विद्यार्थी संघटनाना माझी विनंती आहे की प्रत्येक शाळेत आणि कॉलेज मध्ये जाऊन त्याचे फोटो काढून शोषल मीडियावर टाका असं अदित्य ठाकरे म्हणाले.