Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 17 November 2026 in Marathi : सूर्य एक महिन्यानंतर आपली रास बदलतो. पंचांगानुसार सूर्य आज वृश्चिक राशीत असणार आहे. त्यामुळे पुढील एक महिना सूर्य गोचरचा प्रभाव बारा राशीच्या लोकांवर असणार आहे. असा हा आठवड्याचा पहिला दिवस सोमवार मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्या मनाला शांती मिळणार आहे. विरोधकसुद्धा मैत्रीचा हात पुढे करणार आहे. लोकांमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या आत्मविश्वास वाढणार आहे. एखादे महत्त्वाचे कामं हाती पडणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
तुमच्यासाठी आठवड्याचा पहिला दिवस सामान्य असणार आहे. भावनिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. व्यवहार करताना काळजी घ्या. एखाद्या समाजकार्यात सहभागी होणार आहात.
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. सावधगिरीने व्यवहार करा. कुटुंबातील सदस्यांशी मतभेदाची चिन्ह आहेत.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. आर्थिक समस्या दूर होणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. गाडी चालवताना काळजी घ्या.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस नेहमीपेक्षा उत्तम असणार आहे. कामात यश मिळणार आहे. छोटा व्यवसातूनही प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असला तरी तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. मात्र आज तुम्ही बोलताना संयम बाळगा. नात्यात चढ - उतार जाणवेल.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस चांगला असणार आहे. समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कनिष्ठ तुमच्याकडून मार्गदर्शन घेणार आहेत.
मकर (Capricorn Zodiac)
आजचा दिवस चांगला असणार असून कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणार आहात. प्रगतीच्या नवीन संधी मिळणार आहे. धार्मिक कार्यांमध्ये रस वाटणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस उत्तम असणार असून नशीबाची साथ मिळणार आहे. एखादी गोष्ट अचानक मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीत सामील होण्याची संधी मिळणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस चांगला जाणार असून आर्थिकदृष्ट्या स्वतःला मजबूत करण्यासाठीच्या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)