Litton Das Century : बांगलादेशचा स्टार फलंदाज लिटन दासने दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात जबरदस्त शतक ठोकलं आहे. या शतकासह त्याने फक्त आपल्या संघालाच कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं नाही तर आपल्या मुलीसाठी सुद्धा हे शतक न विसरता येण्यासारखं बनवलं. जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी लिटनने आपले शतक पूर्ण केल्यानंतर ज्या पद्धतीने जल्लोष केला त्याने सर्वांची मने जिंकून घेतली.
लिटन दासने शतक ठोकून केलं अनोखं सेमीब्रेशन :
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनने टाकलेल्या 88 व्या ओव्हरमध्ये पाचव्या बॉलवर चौकार मारून लिटन दासने 154 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. टेस्ट क्रिकेटमधील हे आठवे शतक होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सामन्यात शतक झळकावणारा तो केवळ तिसरा बांगलादेशी फलंदाज ठरला. शतक ठोकल्यावर लिटन दासने खिशातून एक चिठ्ठी बाहेर काढली आणि कॅमेऱ्याच्या समोर दाखवली. या चिठ्ठीच्या कागदावर त्यांनी आपल्या मुलीच्या जन्म दिवसानिमित्त एक खास संदेश लिहिला होता. लिटनने लिहिलं होतं की 'माझ्या राजकुमाराला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. हे शतक तुझ्यासाठी'. या भावूक क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लिटन दास 92 धावांवर नाबाद होता. सोमवारी त्याला शतक पूर्ण करण्यासाठी केवळ आठ धावांची गरज होती आणि त्याने चार ओव्हरपेक्षा कमी ओव्हरमध्ये हा टप्पा गाठला. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.
https://t.co/9Feu3MKjlv
CricCrazyJohns) November 16, 2026
शतक पूर्ण केल्यावर लिटन दास जास्त वेळ मैदानावर राहू शकला नाही आणि 179 बॉलमध्ये 120 धावा करून बाद झाला. इनिंगच्या 96 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर डॅन पॅटरसनने त्याला तंबूत परत पाठवले. या सामन्यातील पॅटरसनची ही दुसरी विकेट होती; याआधी सोमवारी त्याने मेहदी हसन मिराजची विकेट घेतली होती. मिराजने 16 बॉल 10 धावा केल्या होत्या, त्यानंतर विआन मुल्डरने त्याला कॅच आउट झाला.