IPL 2027 : IPL 2027 साठी सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यासाठी बीसीसीआयने 17 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत सारखे खेळाडू आधीच ट्रेड झालेत, त्यामुळे ते ऑक्शनमध्ये दिसणार नाहीत. मात्र जर आगामी सीजनसाठी रिटेन्शनपेक्षा कोणते खेळाडू रिलीज होणार याची चर्चा सध्या क्रिकेटविश्वात जोरदार रंगली आहे.
डिसेंबर महिन्याच्या 16 तारखेला मिनी ऑक्शन होणार असून यापूर्वी फ्रेंचायझी त्यांच्या संघातून महागड्या खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे 25 कोटी किंमतीचा कॅमरुन ग्रीन आहे. तर लखनऊ सुपर जाएंट्सकडे 21 कोटींच्या रकमेचा निकोलस पुरन आहे. ज्याचा मागचा सीजन हा चांगला गेला नव्हता. आयपीएलमधील अशा 5 खेळाडूं विषयी जाणून घेऊयात ज्यांची किंमत ही 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यांना यंदा संघ रिलीज करू शकतात.
कॅमरुन ग्रीन :
2026 च्या ऑस्कशनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने कॅमेरून ग्रीनला 25.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. KKR ने त्याला 'गेम-चेंजर' म्हणून संघात सामील केले होते, मात्र या भूमिकेला न्याय अपयशी ठरला परंतु तो या भूमिकेला न्याय देण्यात अपयशी ठरला असे म्हणता येईल. मागच्या सिजनमध्ये 14 सामन्यांत 322 धावा केल्या आणि 7 विकेट घेतले.
ट्रेंट बोल्ट :
ट्रेंट बोल्ट हा आयपीएलमध्ये त्याचे 150 विकेट्स पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र मागच्या सीजनमध्ये त्याने केवळ 2 विकेट घेतल्यामुळे त्याला संघ रिलीज करू शकतो. गोलंदाजीच्या बाबतीत गेल्या हंगामात बोल्टचा इकॉनॉमी रेट 11.62 इतका होता.
प्रशांत वीर :
रवींद्र जडेजाच्या ट्रेडनंतर आता चेन्नई सुपरकिंग्सला त्याच्या रिप्लेसमेंटची गरज होती. आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने स्पिन गोलंदाज ऑलराउंडर प्रशांत वीर याला 14.20 कोटींना विकत घेतलं. त्याला गोलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही आणि फलंदाजी करताना तो 5 डावांमध्ये मिळून फक्त 90 धावा करू शकला.
मार्कस स्टोइनिस :
हार्दिक पंड्या पंजाब किंग्समध्ये आल्यावर आता मार्कस स्टोइनिसची जागा धोक्यात आली आहे. पंजाबकडे मार्को यान्सेन देखील असून तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे केवळ त्याच्यावर अवलंबून राहून मोठा धोका पत्करणे त्यांना कदाचित योग्य वाटणार नाही. अशा परिस्थितीत स्टॉइनिसला संघातून वगळले जाऊ शकते, कारण एकाच संघात तीन वेगवान गोलंदाजी करणारे ऑलराउंडर खेळाडू असणे जवळजवळ अशक्य आहे.
जीतेश शर्मा :
जीतेश शर्माचा परफॉर्मन्स मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगला नाहीये. RCB त्याला 11 कोटी रुपये देत आहे. मात्र मागच्या दोन सीजनमध्ये जितेश 31 सामने खेळून फक्त 377 धावा करू शकला. त्यामुळे यंदा आरसीबी त्याला रिलीज करू शकते.