• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /तिरंग्याचा अपमान होताना पाहून मोहम्मद सिराजने घेतली सुरक्षारक्षकाकडे धाव, पुढे जे केलं ते पाहून सर्वांनी केलं कौतुक, Video

तिरंग्याचा अपमान होताना पाहून मोहम्मद सिराजने घेतली सुरक्षारक्षकाकडे धाव, पुढे जे केलं ते पाहून सर्वांनी केलं कौतुक, Video

IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेली वनडे सीरिज भारताने जिंकली. यावेळी सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्याने केलेल्या कृतीमुळे त्याचं कौतुक होत आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 16, 2026, 01:53 PM IST|Updated: Nov 16, 2026, 02:47 PM IST
joinshare
तिरंग्याचा अपमान होताना पाहून मोहम्मद सिराजने घेतली सुरक्षारक्षकाकडे धाव, पुढे जे केलं ते पाहून सर्वांनी केलं कौतुक, Video
Image Credit: तिरंग्याचा अपमान होताना पाहून मोहम्मद सिराजने घेतली सुरक्षारक्षकाकडे धाव, पुढे जे केलं ते पाहून सर्वांनी केलं कौतुक, Video

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
भारतीय लष्कराने घेतला कुलगाम हल्ल्याचा बदला! मास्टरमाइंड लतीफ भटला केलं ठार, आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा

भारतीय लष्कराने घेतला कुलगाम हल्ल्याचा बदला! मास्टरमाइंड लतीफ भटला केलं ठार, आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा

2

अजित पवार एनडीएसोबत कसे आले?, अमित शहांनी फडणवीस-शिंदेंसमोर सांगितला किस्सा; 'त्यावेळी मला आश्चर्य...'

3

धक्कादायक! देशातील सोन्याबद्दल हादरवणारी माहिती समोर; 5 वर्षांपासून 83 % सराफांच्या दुकानांतील सोनं...

4

तिरंग्याचा अपमान होताना पाहून मोहम्मद सिराजने घेतली सुरक्षारक्षकाकडे धाव, पुढे जे केलं ते पाहून सर्वांनी केलं कौतुक, Video

5

राष्ट्रवादीत 2 गट? आव्हाडांची सुळेंविरोधात थेट भूमिका? अमित शाहांचं नाव घेत सुळेंकडून सरकार समर्थनाची तयारी; आव्हाड म्हटले, 'त्यांनी दिला ना पाठिंबा? आम्ही तर...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली गेली. रविवार 15 नोव्हेंबर रोजी या वनडे सीरिजमधील पाचवा सामना हा भारताने जिंकला आणि सीरिज 3-1 ने आघाडी घेत जिंकली. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जेव्हा सुरक्षा तोडून एक फॅन मैदानावर पोहोचला. या फॅनच्या हातात भारताचा झेंडा होता. मात्र हा फॅन कोणत्याही खेळाडूच्या जवळ पोहोचेल तेवढ्यात सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. या झटापटीदरम्यान फॅनच्या हातातील तिरंगा हा जमिनीवर पडला. सुरक्षा रक्षकाने तिरंगा आपल्या हाताने तो खेचला. याच दरम्यान तिरंगा हा जमिनीवर पडलेला पाहून मोहम्मद सिराजचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो त्या दिशेने धावला आणि त्याने तिरंगा लेगचच  उचलला.

नेमकं काय घडलं?

जमिनीवर पडलेला तिरंगा पाहून मोहम्मद सिराज तडक इथे धावत गेला. सिराजने जमिनीवरील तिरंगा लगेचच उचलला आणि मैदानाबाहेर नेण्यासाठी आपल्या एका सहकाऱ्याकडे दिली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बे ओव्हलमध्ये खेळण्यात आलेल्या पाचव्या वनडे  सामन्यात भारताने 209 धावांचे लक्ष्य बचावताना गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 22 धावांनी विजय मिळवला. अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतले, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. या विजयासह भारतीय संघाने सीरिज 3-1 अशी जिंकली.

हेही वाचा : जय शाह यांची ICC अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

अर्शदीप सिंहला या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच निवडण्यात आले. तर गुरनूर बरार प्लेयर ऑफ द सीरिज ठरला. गुरनूर बरार ने 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या. पाचव्या वनडे सामन्यापूर्वी तो टेस्ट संघात सामील झाला, ज्यामुळे मोहम्मद सिराजला शेवटच्या वनडे सामन्यासाठी प्लेईंग 11 खेळाडूंच्या संघात स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून, पहिला सामना 19 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Marathi News