केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अमित शाह पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत... जिल्हा परिषद कार्यालयातील दिवंगत अजित पवारांच्या पुतळ्याचे शाहांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्व जेष्ठ नेते सहभागी होते. भारतीय इतिहास संशोधक मंडळाने विकसित केलेल्या मराठा इतिहास डिजिटायझेशन प्रकल्प आणि ऑनलाइन प्रवेश पोर्टलचे शाह यांनी लोकार्पण केले. यावेळी अमित शाह यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.
अजितदादा हे फक्त लोकनेतेच नव्हते तर त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी देखील होतीदादा हे मला भेटले की हंसमुख चेहऱ्याने समोर यायचे.परखडपणा हा त्यांचा गुण होता.एखादी गोष्ट शक्य नसेल तर तोंडावर नाही म्हणायचे.काम होणार असेल तर लगेच हो म्हणून टाकायचे.म्हणूनच मला ते नेहमी भावायचे, असे अमित शाह म्हणाले.
पुणे आणि बारामती बाबतीत अगदी अधिकार वाणीने माझ्याकडे यायचे.साखर कारखानादारीवरील आयकराचा प्रश्न घेऊन ते माझ्याकडे आलेले.ते मी होकार देतात एकदम खुश झाले म्हणाले, आजवर एवढे मंञी येऊन गेले पण कोणीच हे काम केलं नव्हतं...पण तुम्ही साखर कारखानदारीला खूप मोठी मदत केलीय याची आठवण अमित शाह यांनी आवर्जून सांगितली
पुणे में महाराष्ट्र के पूर्व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार जी की प्रतिमा के अनावरण समारोह से लाइव… पुणे येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार जी यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाचे थेट प्रक्षेपण… https://t.co/ji7ZfqH81V
— Amit Shah (@AmitShah) November 16, 2026
कोविड काळात महाराष्ट्राचे सीएम कधीच माझ्याशी संपर्क साधायचे नाही पण दादा सकाळीच मंञालयातील लँडलाईनवरून माझ्याशी संपर्क साधायचे.असा त्यांचा कामाचा झपाटा होता.2015 साली पीसीएमसी मनपाला देशपातळीवरचा स्वच्छता पुरस्कार मिळाला पण त्यात खरा वाटा होता तो दादांचा त्यांनी त्यासाठी 29 आढावा बैठका घेतल्या.
ज्यावेळेस दादांनी एनडीए सोबत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मलाही आश्चर्यचा धक्का बसला होता पण ते महाराष्ट्र विकासासाठी निर्णयावर ठाम राहिले.दादा आमच्यासोबत आल्यानंतर आमचा स्नेह आणखी वृद्धींगत झाला आणि आम्ही दोघं आणखी जवळ आलो होतो. पण हा कामाचा माणूस अकाली गेला आणि आम्हा सर्वांनाच धक्का बसला.पण त्याच्या कामाची शिस्त यापुढेही नेहमीच युवावर्गासाठी प्रेरणा राहिल. ग्रामीण विकासात दादांचे मोठं योगदान राहिलंय, असे ते म्हणाले.
इटलीच्या नेत्यानं केलेल्या या घोषणांनी भाजपला आयतं कोलीत मिळालंय.काँग्रेस भारताच्या अंतर्गत राजकारणात परदेशी नेत्यांना आणत असल्याचा आरोप भाजपने केलाय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय मंचावरून बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर केलाय. आंतरराष्ट्रीय मंचावर जाण्यापेक्षा राहुल गांधींनी देशातील ग्रामीण भागात फिरावं, असा सल्लाही शाहांनी राहुल गांधींना दिलाय.