SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मास्टरमाईंड पंडितच्या घरातून 'त्या' महिलेला अटक

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी धक्कादायक ट्विस्ट आलं आहे. मास्टरमाईंड पंडितच्या घरातून एका तरुणाला अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश आलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 03, 2026, 07:47 AM IST | Updated: Nov 03, 2026, 08:04 AM IST
Image Credit: tiger shroff shooting firing case
Join

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. अशातच मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मास्टरमाईंड अनिल पंडितच्या अगदी जवळचा व्यक्तीला अटक केली आहे. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने 22 वर्षीय तरुणीला अटक केली असून ती अनिल पंडितची वहिनी आहे. 1 नोव्हेंबर  मुंबई गुन्हे शाखेने हरियाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. या अटकेनंतर टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही 13 वर गेली आहे. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES