2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही; शरद पवारांबाबत उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शरद पवारांनी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा जाहीर केल्याने महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Uddhav Thackeray On Sharad Pawar : शरद पवारांनी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. यावेळी उद्ध ठाकरे यांनी शिवसनेची भूमिका जाहीर केली.
मला पण जाता आलं नसता का? मला पण निरोप आले नासतील का? पण मला पक्षाच्या हितापेक्षा महाराष्ट्राचे आणि देशाचे हित जास्त महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी निर्णय मागे घ्यावा. त्यांचा निर्णय काय होतो ते पाहू आणि मग ठरवू कुणी रहायाचं कुणी जायचं? 2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्टालिन तामिळनाडूचा घात करत आहेत. पवार साहब असतील कुणी असतील ते 100 टक्के महाराष्ट्राचा खासदार करतील. या बिलाला पाठिंबा करणारे खासदार महाराष्ट्राचा घात करतील असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. पवारांनी महाराष्ट्र आणि देश हिताचा विचार करावा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या.
मत चोरी करमाऱ्या ज्ञानेश कुमारांना या समितीत घेण्यात आले
सीमांकन करण्याचा अधिकार ज्या समितीला देण्यात आला आहे. ज्याने मत चोरी केली त्या ज्ञानेश कुमरांना या समितीत घेण्यात आले आहे. आणखी एका निवृत्त न्यायाधिशाचा या समितीत समावेश. तिसरा व्यक्ती ज्ञानेश कुमार ठरवणार. ही सर्व जण मोदी आणि अमित शाह यांची माणसं आहेत. यामुळे या समितीत कुणी विरोध करेल असा प्रश्नच येत नाही. ही समिती फ्रॉड आहे. मग या समितीत प्रामाणिक लोक का घेत नाहीत. मम करणारी माणसं त्यांना या समितीत घेणार आहेत.
उघड उघड मोठ्या प्रमाणात मतचोरीचा विषय ते संसदेत आणणार
सीमांकन होताना लोकसभेच्या जागा वाढणार. राज्यसभेच्या जागा वाढणार की नाही याबाबत काहीच माहिती नाही. सीमांकनाचा अनुभव आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत घेतला आहे. जागा वाढवणार आहेत. 850 तुम्ही कसं करणार. आपल्याया पडणारी मत आणि विरोधी पक्षांना पडणारी मत यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. आपले उमेदवार निवडणून येतील अशा प्रकारे ते मतदार सघांची रचना करणार. उघड उघड मोठ्या प्रमाणात मतचोरीचा विषय ते संसदेत आणणार आहेत. महाराष्ट्रात जागा वाढणार असून 48 च्या 72 जागा होणार आहेत. 48 जागांचा आकडा पाहता बिहारमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या आकड्या इतकी वाढ होणार आहे.
महिलांच्या नावाखाली नीच राजकारण
महाराष्ट्राचा गळा दाबण्याचा प्रयत्न. महिला विधेयक यात आणले जात. महिला विधेयक वेगळे करुन आणले तर महिला विधेयकाला मी आत्ता पाठिंबा देऊन. आत्ता जो काही आकडा आहे त्यातच महिलांना51 टक्के आरक्षण द्या. मतदार फोडण्याची रंगीत तालीम यांनी मुंबई महापलिका निवडणुकीत केली आहे. चापलुसगिरी करणारा ज्ञानेश कुमार हा यांचा म्होरक्या आहे. खासदारांचा आकडा वाढवण्याऐवजी त्यांचा निधी वाढवा. 26 लाख लोकसंख्या किवा सर्वाधिक असलेल्या भागात खसादार दिसत नाही असे बोलतात. किती खासदार संसदेत हजर असतात याची आकडेवारी द्या. उद्या म्हणतील लोकसंख्या वाढली आहे पंतप्रधानाची संख्या वाढवा. आत्ताच सभागृहात खासदारांची मोठी संख्या आहे. आत्ताच अध्यक्षांना खासदार हाताळता येत नाहीत मग, उद्या अध्यक्षांची संख्या वाढवणार का?