SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेट सोन्याची विक्री; महाराष्ट्रात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात खळबळ, चिनी ‘गोल्ड पावडर'चा वापर

सोन्याचे वजन वाढवण्यासाठी चीनमधील रेनियम पावडरचा वापर होत असल्याचा प्रकार चर्चेत आला आहे. 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने विकले जाण्याची शक्यता आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 22, 2026, 20:21 IST | Updated: Nov 22, 2026, 20:38 IST
Join

जळगाव सराफा बाजार : सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीची संधी उपलब्ध होत असतानाच आता सोन्याच्या शुद्धतेबाबत एक वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. सोन्याचे वजन वाढवण्यासाठी चीनमध्ये तयार होणाऱ्या रेनियम पावडरचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

या पावडरला बाजारात ‘गोल्ड पावडर’ म्हणूनही ओळखले जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या पावडरच्या मिश्रणामुळे 22 कॅरेटचे सोने म्हणून विकल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये प्रत्यक्षात 20 कॅरेटपर्यंतच शुद्ध सोने असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चायनाची सोन्याची पावडर अर्थात रेनियम हा जड धातू असल्याने सोन्यात त्याचे मिश्रण केल्यास प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण न वाढवता दागिन्यांचे वजन वाढवता येथे अशी चर्चा आहे. परंतु देशभरात या प्रकाराची व्याप्ती किती आहे, याबाबत अद्याप ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर जळगावच्या सराफा बाजारातही सोन्याच्या शुद्धतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

 जळगाव जिल्हा सुवर्णनगरी म्हणून ओळखला जातो. जळगावचे सोने संपूर्ण देशभरामध्ये शुद्धतेसाठी ओळखले जाते. येथील सराफा व्यावसायिकांच्या मते, भारतातील बाजारपेठेत अशा पावडरचा वापर करून दागिने बनविण्याचा प्रकार जळगाव अध्याप तरी समोर आलेला नाही.

परंतु स्मगलिंगच्या माध्यमातून येणाऱ्या सोन्यामध्ये अशा प्रकारच्या भेसळीची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ चर्चेच्या आधारे जळगावातील सराफा बाजाराबाबत संशय निर्माण करणे योग्य नसल्याची भूमिका स्थानिक व्यावसायिकांकडून मांडली जात आहे. 

दुसरीकडे, सोने कारागिरांच्या मते, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये या पावडरच्या वापराची चर्चा अधिक आहे. मात्र, जळगावातील दागिन्यांमध्ये सोन्याची शुद्धता अद्यापही कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सोन्याची खरेदी करताना ग्राहकही आता अधिक सतर्क झाले आहेत. लग्नकार्य असो किंवा भविष्यातील गुंतवणूक, सोन्याच्या शुद्धतेला विशेष महत्त्व दिले जाते. दागिन्यांच्या शुद्धतेबाबत शंका राहिल्यास नातेसंबंधांमध्येही गैरसमज निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे हॉलमार्क तपासूनच सोने खरेदी करतो, तसेच जीएसटीसह पक्के बिल घेतो, अशी प्रतिक्रिया महिला ग्राहकांनी दिली.

 सोन्याच्या खरेदीत केवळ दर कमी असणे महत्त्वाचे नसून त्याची शुद्धता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची असल्याचेही ग्राहकांचे म्हणणे आहे. एकीकडे सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीसाठी ग्राहकांची उत्सुकता वाढत आहे, तर दुसरीकडे चिनी गोल्ड पावडरच्या चर्चेमुळे शुद्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र जळगावचे सोने संपूर्ण देशात शुद्धतेसाठी ओळखले जात असल्यामुळे या चिनी पावडरच्या चर्चेचा परिणाम अद्याप तरी जळगावच्या सराफा बाजारावर झाल्या नसल्याचे चित्र आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES