SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

557 कुटुंबांना मिळणार म्हाडाच्या घराच्या चाव्या, दसरा नव्या घरात साजरा होणार?

बीडीडीकरांना दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या घराच्या चाव्या मिळण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलं?

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 07, 2026, 08:31 AM IST | Updated: Oct 07, 2026, 08:33 AM IST
Image Credit: Worli BDD Chawl Redevelopment Project
Join

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दसऱ्यापर्यंत नवीन घरांत गृहप्रवेश करण्याची शक्यता आहे. ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 22 मजल्यांच्या तीन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं 557 कुटुंबांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घरांच्या चाव्या मिळण्याची शक्यता आहे. तशी तयारी म्हाडाने सुरू केली आहे.

म्हाडासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत ना.म.जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे, रहिवासी, अधिकारी उपस्थित होते. तसंच, घरांचा ताबा दिल्यानंतर रहिवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आधीच आवश्यक त्या सुविधा आणि उपाययोजना करण्यात यावे असे निर्देश म्हाडाने दिले आहेत.

अटी आणि संबंधित विभागाकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे घेण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इमारतीची आवश्यक कामे पूर्ण करुन संबंधित विभागांची प्रमाणपत्रे मिळवण्याच्या सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मंजूर आराखड्यानुसार संबंधित इमारतीत 22 व्या मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाले असून रहिवाशांना घरे देण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण केली जात आहेत.

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी घराच्या ताबा देण्याच्या उद्देशाने हालचाली सुरू केल्यामुळं नवरात्रोत्सव नव्या घराच्या चाव्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं बीडीडीकर दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश करु शकतात.

म्हाडाच्या इमारत परवानगी कक्षाने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार पुनर्वसन इमारतीतील संबंधित विंगसाठी भोगवाटा प्रमाणपत्राची प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे.

जीटीबी नगर पुनर्विकासाला वेग

सायन कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) पुनर्विकास प्रकल्पातील 1,200 कुटुंबांना 1 नोव्हेंबरपासून महिन्याला 20 हजार रुपये तर पात्र ठरलेल्या 121 दुकानदारांना व झोपडीधारकांना 10 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. 196 सशर्त पात्र धारकांनाही सहा महिन्यांचे भाडे दिले जाणार आहे. सशर्त पात्र गाळेधारकांना सहा महिन्यांत आवश्यक कागदपत्रे सादर करून पात्रता सिद्ध करणे आवश्यक राहील, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES