Maharashtra Breaking News Today LIVE : शिवसेनाभवनासमोर ठाकरे सेनेचे आंदोलन, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 19 november 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 19 november 2026 : दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. यावरुन राजकीय वाद पेटला आहे. तर एकीकडे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये सावरकरांचा अपमान झाल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून शायना एनसींविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.
19 Nov 2026 12:15 IST
राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय
- तात्पुरत्या किंवा बंद नळयोजना सुरू करणे तसेच टॅंकर आणि बैलगाडीतून पाणीपुरवठा करण्यासाठी दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचा पुढाकार
- जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना ४० लाखांपासून एक कोटींपर्यंतचे आर्थिक मंजुरीचे अधिकार
- आर्थिक मर्यादा वाढीचा शासन निर्णय जारी
19 Nov 2026 12:13 IST
महाराष्ट्राच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा! जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा आता...
बुलढाण्यातील आपल्या लोणार सरोवराला इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेसने (IUGS) जगातील तिसऱ्या 100 महत्त्वपूर्ण भूशास्त्रीय वारसा स्थळांमध्ये स्थान दिले आहे. उल्कापातातून साकारलेल्या या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराला मिळालेली ही जागतिक पावती आहे. यामुळे लोणारचा पर्यटन विकास, संशोधन आणि जतन या तिन्ही गोष्टींना आता नवे बळ मिळणार आहे.
19 Nov 2026 11:52 IST
शायना एनसींविरोधात शिवसेनाभवनासमोर ठाकरे सेनेचे आंदोलन, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले
20 वर्षात भारतात गुंतवणुकीला प्राधान्य: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या वार्षिक परिषदेत सांगितले की, जागतिक मानांकन संस्था भारताच्या प्रगतीची प्रशंसा करत आहेत. त्यांनी नमूद केले की, भारताची वस्तू निर्यात 50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडली आहे. स्वदेशीला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर जोर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपण स्वदेशीला प्रोत्साहन दिले पाहिजे."
फिक्की आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करत आहे. एका संस्थेसाठी शंभर वर्षे सतर्क आणि सक्रिय राहणे, बदलत्या काळाशी जुळवून घेणे आणि देशाच्या आर्थिक प्रवासात आपली भूमिका बजावत राहणे ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. ते म्हणाले की, आपल्या 100 वर्षांच्या प्रवासात फिक्कीने भारतीय उद्योगाला अनेक मैलाचे दगड गाठताना पाहिले आहे. आता पुढील २० वर्षांत भारतीय उद्योग काय साध्य करू शकतो, हे ठरवण्याची वेळ आली आहे.
19 Nov 2026 11:08 IST
दाऊद इब्राहिमचं मुंबईतील घर जमीनदोस्त
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या घरावर हातोडा... मुंबईच्या भेंडी बाजारातील घर आणि कार्यालय असलेल्या इमारतीवर महापालिकेची कारवाई...कडेकोट पोलीस बंदोबस्तात तोडकाम सुरु...
19 Nov 2026 11:06 IST
शायना एनसींविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक
शायना एनसींविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मुंबईतील भारतमाता टॉकीज परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.
19 Nov 2026 11:02 IST
जलयुक्त शिवार 3.0 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या हालचाली
जलयुक्त शिवाराचा तिसरा टप्पा डिसेंबरपासून सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्यात... 2026-24 आणि 2028-29 या तीन वर्षात 15 हजार गावं जलयुक्त केली जाणार आहेत... गावांना दुष्काळमुक्त करणं आणि पाण्याची उपलब्धता वाढवणं हा त्यामागील हेतू आहे... डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवर योजना सुरु झालीय... दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात... यंदा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी जीआर मॅपिंग सारख्या आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे...
19 Nov 2026 11:01 IST
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय. तात्पुरत्या किंवा बंद नळयोजना सुरू करणे तसेच टॅंकर आणि बैलगाडीतून पाणीपुरवठा करण्यासाठी दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचा पुढाकार. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना 40 लाखांपासून एक कोटींपर्यंतचे आर्थिक मंजुरीचे अधिकार. आर्थिक मर्यादा वाढीचा शासन निर्णय जारी
19 Nov 2026 11:00 IST
'बाळासाहेबांचा फोटो फाडणा-यांवर कारवाई करा'
खासदार संजय राऊत यांची मागणी ---- 'बाळासाहेबांना सरकारकडून राष्ट्रपुरुषाचा दर्जा' ---- फोटो फाडण्याचं कृत्य निंदनीय, संतापजनक- राऊत ---- सोशल मीडियावर पोस्ट करताना संजय राऊतांनी कायद्यावर बोट ठेवलंय..
19 Nov 2026 11:00 IST
कांदा सर्वसामान्यांना रडवणार?
देशात यंदा कांदा उत्पादनात 19 लाख टन घट होण्याचा अंदाज...दुष्काळामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील कांदा लागवडीत मोठी घट...आगामी काळात कांदा सर्वसामान्यांना रडवण्याची शक्यता...
19 Nov 2026 10:59 IST
तूप, बटर, पनीरही महागणार
मुंबईकरांच्या रोजच्या आहारातील दही, पनीर, बटर आणि तुपाच्या दरांनीही आता उसळी घेतली आहे. दूध दरवाढीनंतर तूप, बटर, पनीरही महागणार... दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ... दरवाढ झालेल्या ठिकाणी एक लिटर पॅकबंद शुद्ध तुपाचा दर सुमारे ६३० रुपयांवरून ६८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.गाईच्या तुपाचा एक लिटरचा दर ६९५ रुपयांवरून सुमारे ७३५ रुपये झाला आहे. रोजच्या वापरातील ५०० ग्रॅम पॅकबंद बटरचा दर ३१० रुपयांवरून ३२५ रुपये, तर १०० ग्रॅम बटरचा दर ६३ रुपयांवरून ६६ रुपये झाला आहे.
19 Nov 2026 10:56 IST
गोकुळचं दूध 4 रुपयांनी महागलं
म्हशीच्या दूध विक्री दरात 4 रुपयांची वाढ... एक लीटर दुधासाठी 82 रुपये मोजावे लागणार...
19 Nov 2026 10:54 IST
इम्तियाज जलील आज नाशिक कोर्टात हजेरी लावणार...
नाशिक धर्मांतर प्रकरणात जलील यांच्यावर गुन्हा दाखल... जलील यांच्या स्वागतासाठी नाशिक शहरात बॅनरबाजी...
19 Nov 2026 10:54 IST
अजितदादांच्या अपघातावरून केलेल्या आरोपांनंतर रोहित पवार राष्ट्रवादीत एकाकी
अजित पवारांच्या अपघातावरून केलेल्या आरोपांनंतर रोहित पवार राष्ट्रवादीत एकाकी... रोहित पवारांचे आरोप वैयक्तिक, पक्षाशी संबंध नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी हात झटकले... दादांच्या राष्ट्रवादीकडूनही आरोपांचं समर्थन नाही
19 Nov 2026 10:53 IST
दादरच्या चैत्यभूमी नामकरणावरून वाद
दादरच्या चैत्यभूमी नामकरणावरून वाद...'दादरकरांचं मत विचारात घेतलं नाही'...'दादरकरांची ओळख पुसण्याचं काम'.मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची पोस्ट....
19 Nov 2026 10:53 IST
शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी मागितली माफी
शायना एनसी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक लांबलचक पोस्ट करत माफी मागितली आहे. "बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते," असं शायना एनसी म्हणाल्यात.
19 Nov 2026 10:52 IST
शायना एनसींविरोधात शिवसेना UBT आक्रमक
शिवसेना UBTचं आज मुंबईसह राज्यभर आंदोलन.... शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन....
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे. गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या. मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.