Maharashtra Breaking News LIVE : 03 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 03 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Published: Nov 03, 2026, 06:29 AM IST
| Updated: Nov 03, 2026, 09:06 AM IST
Image Credit: Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 03 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 03 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
03 Nov 2026, 9:05 AM
सांगली जिल्हा बँक, 6 जागांचा आज फैसला
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बँकेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी होणार असून, यामध्ये सर्वाधिक लक्ष जत सोसायटी गटाच्या निकालाकडे लागलंय.... या गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांच्यात चुरशीची लढत झाली आहे...जत सोसायटी गटात अवघे 87 मतदार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विजयासाठी 45 मतांचा आकडा गाठणे आवश्यक असल्याने दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. तर सातारा, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचाही आज फैसला होणार आहे, अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये लंके विरुद्ध विखे समर्थकांमध्ये सामना रंगला होता.. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय. तर साता-यातही जिल्हा बँकेचा निकाल लागणार आहे..
03 Nov 2026, 8:37 AM
सिंधुदुर्गात ओंकार हत्तीवर रॉकेट हल्ला
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात ओंकार हत्ती राजरोस वाडी वस्त्यांमध्ये फिरत असून त्याच्याकडून शेतीचे नुकसान होत आहे. ओंकार हत्तीला लांब घालविण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीवर पेटत्या मशाली फेकल्याचा वीडियो व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेचा नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र, असाच वीडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये ओंकार हत्तीवर रॉकेटद्वारे हल्ला केल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
03 Nov 2026, 8:02 AM
एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन
एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.... एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली.... ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार आहे.... मागण्यांची पूर्तता न झाल्यास ५ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे..... आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये घंटानाद करून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.... तर उद्या सर्व आगारांमध्ये द्वारसभा आणि निदर्शने होणारेय.... त्यानंतर ५ नोव्हेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.... दरम्यान, आज दुपारी १ वाजता मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर घंटानाद, निदर्शने आणि द्वारसभेचे आयोजन करण्यात आलंय..
03 Nov 2026, 7:29 AM
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना केंद्र सरकारचा दिलासा
केंद्र सरकारने NDRF अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये बदल केले आहेत... नव्या निकषांनुसार खरीप, जिरायती शेती, बागायती शेती, फळबागा, पशुधन, कुक्कुटपालन तसेच घरांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे...अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत अधिक मदत मिळणार आहे... दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना या वाढीव निकषांचा दिलासा मिळणार का, असा प्रश्न आहे.
03 Nov 2026, 7:00 AM
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी महिलेला अटक
Tiger Shroff Firing Case : अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे... हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक केली आहे... हरियाणा पोलिसांच्या मदतीनं 1 नोव्हेंबरला अटकेची कारवाई केली आहे.... या अटकेमुळे प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 13 वर गेली आहे...
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.