SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पोर्टेबल सोनोग्राफी मशीन अन् बोगस डॉक्टर, शेतातील गोठ्यात सुरू होता भयंकर प्रकार, समोरचं दृश्य पाहून पोलिसही हादरले

बुलढाण्यात अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शेतातील पत्र्याच्या गोठ्यात सुरू होता बेकायदेशीर सोनोग्राफीचा धंदा

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 22, 2026, 13:40 IST | Updated: Nov 22, 2026, 13:42 IST
Image Credit: Buldhana News three people including a bogus doctor were caught conducting determination tests in a farm shed
Join

बुलढाणा जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीवर पीसीपीएनडीटी पथकाने कारवाई केली आहे.  बोगस डॉक्टरसह तीन जणांना रंगेहात पकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा पथकाच्या संयुक्त कारवाईत अमडापूर-लव्हाळा मार्गावरील शेतात सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आला असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमडापूर–लवाळा मार्गावरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी विभागाने संयुक्तपणे रचलेल्या सापळ्यात एका बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात ताब्यात घेतलं आहे.

विशेष म्हणजे, तब्बल आठ तास संशयित डॉक्टरचा माग काढल्यानंतर डिकॉय केसच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तपासणीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धक्कादायक म्हणजे, हा सगळा प्रकार शेतातील पत्राच्या गोठ्यात सुरू होता. बोगस डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन ठिकठिकाणी जाऊन गर्भलिंग निदान करीत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. या कारवाईदरम्यान बोगस डॉक्टर घटनास्थळावरुन पसार झाला. तर वाशिम येथील एजंट राहुल नामदेव इंगळे आणि शेतमालक शंकरराव सूर्यवंशी व श्रेयस गणेश सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रशासनाच्या या कारवाईनंतर आता या प्रकरणात आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय चिखलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES